शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनो, लसीकरण करून घ्या, पाच सप्टेंबरची डेडलाइन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST

नाशिक : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आता ओसरत असला तरी कोरोनाचा धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. केरळ व महाराष्ट्रात अद्यापही ...

नाशिक : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आता ओसरत असला तरी कोरोनाचा धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. केरळ व महाराष्ट्रात अद्यापही कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासन आता प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे शासनाने कोरोना लस घेण्यासाठी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही ५ सप्टेंबरपर्यंतची डेडलाइन दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने प्रथम आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. नाशिक महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात अपवाद वगळता ७० ते ८० टक्के शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये रुजू होताना, शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीसह कोरोना लसीकरण बंधनकारक केले आहे. परंतु, अद्यापही शेकडो शिक्षकांनी कोरोना लसीकरण करून घेतलेले नाही. लसीकरणाबाबत शिक्षकांच्या मनातही काही गैरसमज पसरलेले असल्यामुळे अनेकांनी कोरोनाची लस घेतली नाही. काहींनी वेळकाढू धोरण स्वीकारल्यामुळे लस घेतली नाही. परंतु, आता राज्य शासनाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना लसींचे दोन्ही डोस घेण्याची सक्ती करीत, ५ सप्टेंबर शिक्षक दिनापर्यंत डेडलाइन दिली आहे. तसे आदेशच शिक्षणाधिकाऱ्यांना दिले असून, शिक्षणाधिकाऱ्यांनीही संबंधित शाळांना तसे आदेश दिले आहेत.

--

बहूतांश शिक्षकांचे झाले लसीकरण

शिक्षकांचे जवळपास ७० ते ८० टक्के लसीकरण झालेले आहे. उर्वरित शिक्षकांसाठी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन केल्यास सर्वच शिक्षकांचे लसीकरण पूर्ण होऊन लवकरच शाळाही सुरू होऊ शकतील. पालकांनी आपले लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणखीनच वाढण्यास मदत होईल.

- नंदलाल धांडे, अध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक संघ

---

मनपा शिक्षणाधिकारी कार्यालयाने पत्रक काढून शिक्षकांना लसीकरण करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शहरातील ९० टक्के शिक्षकांचे लसीकरण झाले असून, जिल्ह्यात हे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत आहे. काही शिक्षकांचे वैद्यकीय कारणांनी लसीकरण राहिले असले तरी तेही लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे.

-नीलेश ठाकूर, राज्य समन्वयक माध्यमिक शिक्षक संघ

---

आतापर्यंत झालेले लसीकरण

जिल्ह्यातील बहूतांश शिक्षकांचे लसीकरण झालेले आहे. जवळपास ८० ते ९० टक्के शिक्षकांनी लसीचा पहिला व दुसरा डोस असे दोन्ही डोस घेतले आहेत. परंतु, शिक्षण विभाग अथवा आरोग्य खात्याकडे शिक्षकांच्या लसीकरणाची वेगळी नोंद नसल्याने नेमके किती शिक्षकांचे लसीकरण झाले याचा खात्रीशीर आकडा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यासाठी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील विविध शाळांकडून किती शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. यात पहिला व दुसरा डोस घेणारे शिक्षक किती याविषयी माहिती मागवली आहे.

बहूतांश शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. परंतु, नेमक्या किती शिक्षकांनी दोन्ही डोस घेतले व कितींनी केवळ पहिला डोस घेतला याविषयी माहिती उपलब्ध नाही. ही माहिती शिक्षण विभागाकडून घ्यावी लागेल.

- रवींद्र चौधरी, जिल्हा व बाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद