शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ताडपत्री, प्लास्टिक कापडाची मागणी वाढली

By admin | Updated: June 5, 2016 22:15 IST

मान्सूनचे वेध : ग्रीन मॅट, कार कव्हर अधिक मागणी; आकर्षक रंगातील छत्र्यांचे आकर्षण

 नाशिक : अंदमानात वेळेवर दाखल झालेला पाऊस केरळपासून संथ प्रवास करणार असला तरी येत्या पंधरवड्यात मान्सून महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता असल्याने जोरदार पावसापासून घराचे व शेतमालाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या ताडपत्रीला मागणी वाढली आहे. शहरातील बाजारपेठांसह कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील दुकानांमध्ये पाणकापड, ताडपत्री खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ग्राहकांकडून रेनकोट, छत्री, पावसाळी चप्पल बूट आदि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचीही मोठी खरेदी होत आहे.शहरातील बाजारपेठांमध्ये ताडपत्री खरेदीदारांची संख्या वाढली आहे. पावसाच्या आगमनापूर्वी शहरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी ताडपत्री व प्लास्टिकचे कापड खरेदी करून घराचे छत व जनावरांच्या गोठ्यांचे छत दुरुस्त करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे प्लास्टिक कापडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये व्यापाऱ्यांकडूनही खरेदीदारांना हव्या त्या आकारामध्ये ताडपत्री व प्लास्टिक कागदाची मागणी पूर्ण केली केली जात आहे, तर काही शेतकरी औद्योगिक वसाहतींमधून ताडपत्री आणि प्लास्टिकच्या कापडाची खरेदी करीत आहे. शेतकरीवर्गाकडून काळ्या प्लास्टिकला अधिक मागणी असून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी ताडपत्री किंवा प्लास्टिक कापड खरेदी करीत आहेत. दोन प्रकारात उपलब्ध असलेल्या लॅमिनेशन रोल व लॅमिनेशन ताडपत्रीची किंमत ३५ रुपये मीटरपासून ते ५० रुपये मीटरपर्यंत आहे. (प्रतिनिधी)