शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

टॅँकरच्या पाण्यामुळे कोट्यवधीची झळ !

By admin | Updated: June 13, 2014 00:22 IST

सिन्नर तालुक्यासाठी दररोज सुमारे पाच लाख ८७ हजार रुपये खर्च येतो.

 

शैलेश कर्पे

सिन्नरगेल्या अनेक वर्षांपासून सिन्नरकरांचे टॅँकरसोबत निर्माण झालेले नाते दिवसेंदिवस अधिक गहिरे होत असल्याचे चित्र आहे. सिन्नर तालुक्यात ४० गावे व २१६ वाड्या-वस्त्यांना ६६ टॅँकरद्वारे दररोज सुमारे २४० फेऱ्या सुरू आहेत. या टॅँकरच्या खर्चापोटी शासनाला फक्त सिन्नर तालुक्यासाठी दररोज सुमारे पाच लाख ८७ हजार रुपये खर्च येतो. तीन वर्षांत सिन्नर तालुक्यातील टॅँकरच्या खर्चापोटी शासनाला ११ कोटी २० लाख रुपये मोजावे लागल्याचे आकडेवारीहून दिसून येते. सिन्नर तालुका अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो. दरवर्षी उन्हाळ्यात येथील जनतेची तहान भागविण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. विशेषत: तालुक्याच्या पूर्वभागातील काही गावांना तर पावसाळ्यातही टॅँकरच्या फेऱ्या सुरूठेवण्याची वेळ येते. इतकी पाणीटंचाईची तीव्रता भयानक आहे. गेल्या चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने तालुक्यातील काही गावांना तर अक्षरश: सलग तीन वर्षांपासून टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. ५ मे २०११ पासून ते आजपर्यंत काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. ६६ टॅँकरमध्ये २१ शासकीय टॅँकर असून, ४५ खासगी टॅँकर आहेत. दररोज या टॅँकरच्या इंधन, पाणीपट्टी, टॅँकरभाडे, चालकांचा प्रवासभत्ता, विहीर अधिग्रहण यापोटी दररोज पाच लाख ८७ हजार ९२० रुपये खर्च येतो. तीन वर्षांत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेला ११ कोटी २० लाख रुपयांची आकडेवारी पाहिल्यानंतर मती गुंग होते. दरवर्षी उन्हाळ्यात टॅँकरसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतो. त्यापेक्षा टंचाईग्रस्त गावांमध्ये कायमस्वरूपी पाणीयोजना राबविल्यास टॅँकरवरचा खर्च बंद होईल व ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटंकती बंद होईल.सिन्नर तालुका ‘टॅँकरमुक्त’ करण्याचा घोषणा अनेक लोकप्रतिनिधींनी केल्या. मात्र दरवर्षी टॅँकरची संख्या व टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. फक्त टॅँकरने पाणी पुरविण्यासाठी दरवर्षी सरासरी साडेतीन कोटी रुपये खर्च होतो. तालुका खऱ्या अर्थाने टॅँकरमुक्त करण्यासाठी शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना तळमळीने काम करून कायमस्वरूपी पाणीयोजना राबविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.