शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

मऱ्हळ येथे देवाची बोळवण करीत यात्रेची सांगता

By admin | Updated: February 15, 2017 23:14 IST

प्रतिजेजुरीचा उत्सव : लाखभर भाविकांनी घेतले खंडोबा देवाचे दर्शन

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मऱ्हळ येथील प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा महाराज यात्रोत्सवाची मंगळवारी उत्साहात सांगता झाली. ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’ च्या जयघोषात हातात दिवटी व बुधली घेऊन भंडारा अन् खोबऱ्याची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाल बागेतून खंडेरायाची बोळवण करण्यात आली. राज्यातील सुमारे लाखभर भाविकांनी लाडक्या देवाचे दर्शन घेतले. पांगरी येथून शनिवारी रथ आल्यानंतर यात्रोत्सव सुरूझाला होता. आकर्षक विद्युत रोषणाईने सजविलेला रथ वाजत गाजत मंदिरासमोर आल्यावर खंडेराव महाराजांच्या पालखी व मूर्तीची परीट समाजातील सगर कुटुंबीयांनी अनंत योगाच्या देव्हाऱ्याची विधिवत पूजा केली. देवाच्या आरतीनंतर रथाच्या दर्शनासाठी यात्रेकरुंची गर्दी झाली होती. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. शनिवारी रात्री रथ व खंडेराव महाराजांची पालखी ‘महाल बागेत’ आल्यावर परिसरातील निऱ्हाळे, कणकोरी, माळवाडी, सुरेगाव, खंबाळे, पांगरी, निमोण, सायखेडा, नांदूरशिंगोटे, मानोरी, दोडी, वावी, घोटेवाडी, सिन्नर आदि गावांतील भाविकांनी आपापले ‘देव’ महालबागेत भेटीसाठी आणले. रात्री १२ पासून पहाटे ६ पर्यंत वाघे मुरळीच्या जागरणाचा कार्यक्रम झाला. यात्रेत नवसपूर्तीसाठी भाविकांनी भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. यात्रेमुळे परिसर पिवळ्याधमक भंडाऱ्यात न्हाऊन निघाला होता. यात्रेत मेवा, मिठाई, खेळणी, भंडारा, पेढे, खोबरे, रहाटपाळणा, प्रसाद, भांड्यांची दुकाने थाटली होती. त्याच्या खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. चार दिवस सुरू असलेल्या यात्रोत्सवाची सांगता मंगळवारी करण्यात आली. चार दिवसांत हजारो भाविकांनी प्रतिजेजुरी मऱ्हळ येथील निऱ्हाळे रस्त्यालगत असलेल्या महालबागेतील खंडेराव महाराजांच्या पालखी दर्शनाचा लाभ घेतला. यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने कुणी नवसपूर्ती करत होता, तर कुणी लोटांगण घालून शरण येत होता. अनेक जण खाऊ, खेळणी घेण्यात दंग होते. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी यात्रा समिती व जय मल्हार मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)