शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

विवरणपत्र न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा

By admin | Updated: June 25, 2014 00:13 IST

विवरणपत्र न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा

 

नाशिक : एलबीटी रद्द होण्याच्या शक्यतेमुळे व्यापारी आणि उद्योजकांकडून वार्षिक विवरणपत्र भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. व्यापारी आणि उद्योजकांची नोंदणी २९ हजार इतकी असताना आत्तापर्यंत केवळ ३०० व्यावसायिकांनी विवरणपत्र भरले आहे. त्यामुळे महापालिकेला आता कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी करावी लागली आहे. येत्या रविवारपर्यंत एलबीटी न भरल्यास सोमवारपासून पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच अगदीच टोकाला गेल्यास कारावासापर्यंत शिक्षा होऊ शकते.एलबीटीतील तरतुदीनुसार महापालिकडे नोंदणी असलेल्या व्यापारी आणि व्यावसायिकांनी आर्थिक वर्ष संपल्यानंतर तीन महिन्यांच्या आता वार्षिक विवरणपत्र दाखल करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यातून खरोखरीच स्थानिक स्तरावर माल खरेदी केला का आणि अन्य व्यापाऱ्यांकडून माल खरेदी केला असेल तर त्यावर त्याने तरी एलबीटी भरला किंवा नाही याची पडताळणी होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. असे असताना एलबीटी रद्द करण्याच्या शक्यतेने व्यावसायिकांकडून थंड प्रतिसाद मिळत आहे. पालिकेकडे २९ हजार ५७६ व्यावसायिकांनी एलबीटीसाठी नोंदणी केली आहे. मात्र, विवरणपत्र भरण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असताना ३०० व्यावसायिकांनीच विवरण पत्रे भरली आहेत. नियमानुसार २९ जूनपर्यंत मुदत असून त्यातील आता शेवटचे पाच दिवस शिल्लक आहेत. त्यातही चौथा शनिवार म्हणून २८ तारीख तर रविवारीदेखील सार्वजनिक सुटी आहे. तरीही या दिवशी एलबीटी विभाग सुरू ठेवून विवरणपत्र स्वीकारले जाणार आहे. मुदतीत विवरणपत्र न भरणाऱ्या व्यावसायिकांना पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी वेळेत एलबीटी विवरणपत्र भरावे, असे आवाहन एलबीटी उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी केले आहे. (प्रतिनिधी)