शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

तैवानच्या उद्योजकांना नाशिकची भुरळ

By admin | Updated: October 18, 2016 02:53 IST

निमात चर्चा : परस्पर संबंध वाढविण्यावर एकमत

नाशिक : मुबलक हवा, पाणी आणि पायाभूत सुविधांबरोबरच उपलब्ध तंत्रज्ञान यामुळे तैवानने नाशिकमध्ये औद्योगिक गुंतवणुकीत स्वारस्य दाखविले असून, लवकरच उद्योजकांची ७० ते ८० सदस्यांचे शिष्टमंडळ नाशिकमध्ये येणार आहे. तैवान आणि नाशिक यांच्यात परस्पर औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय सोमवारी निमा या उद्योजकांच्या संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात घेण्यात आला.नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच निमाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास तैवान कौन्सुलेटचे विपणन विभागाचे असोसिएट रिसर्चर रूई वेंग शेन, ट्रेड प्रमोशन स्पेशालिस्ट सोनाली हुले प्रामुख्याने उपस्थित होते, तर निमाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर उपस्थित होते. नाशिकमध्ये इंटिग्रेटेड स्टिल पार्ट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इंडस्ट्रीयल आॅटोमेशन, कंझुमर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक साहित्य उत्पादने या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगतानाच टेक्सटाइल पार्क उभारता येऊ शकतो. तसेच या क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे आदान प्रदानदेखील होऊ शकते, असे निमाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राविषयी माहिती देणारी चित्रफितही दाखविण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर यांनी नशिकमध्ये उपलब्ध औद्योगिक झोनविषयी माहिती दिली. तसेच शासनाच्या इज आॅफ डुर्इंग बिझनेस प्रणालीमुळे नाशिकमध्ये येऊ घातलेल्या उद्योगांना कमीत कमी परवानग्या घ्याव्या लागतील आणि सवलतीही मिळणार असल्याचे सांगितले. प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी नाशिकमध्ये उपलब्ध औद्योगिक क्षेत्राची माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत महाराष्ट्र चेंबरचे संतोष मंडलेचा, मनीष कोठारी, संजीव नारंग, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, खजिनदार हर्षद ब्राह्मणकर, ज्ञानेश्वर गोपाळे, संजय सोनवणे यांनी सहभाग घेतला. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. निमाचे सरचिटणीस उदय खरोटे यांनी सूत्रसंचालन केले. आभार मनीष रावल यांनी मानले. यावेळी मंगेश काठे, एस. के. नायर, उदय रकिबे, संदीप भदाणे, मितेश पाटील, सुनील बाफना यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)