शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

रेडिमेडच्या जमान्यात टेलरिंग व्यवसाय डबघाईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 00:17 IST

देवगांव : प्रत्येक कुटुंबाला जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा फॅमिली टेलरही असतो. व्यावसायिकदृष्ट्या डॉक्टरांना चांगले दिवस आले असले, तरी टेलरिंग व्यावसायिक मात्र गेल्या काही वर्षांपासून चिंताग्रस्त बनला आहे. रेडिमेड कपड्यांच्या जमान्यात टेलरिंग व्यवसाय डबघाईला आल्याने पारंपरिक व्यावसायिक विवंचनेत सापडले आहेत.

ठळक मुद्देरेडिमेडच्या जमान्यात देखील टेलरिंग व्यवसाय तग धरून होता.

देवगांव : प्रत्येक कुटुंबाला जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा फॅमिली टेलरही असतो. व्यावसायिकदृष्ट्या डॉक्टरांना चांगले दिवस आले असले, तरी टेलरिंग व्यावसायिक मात्र गेल्या काही वर्षांपासून चिंताग्रस्त बनला आहे. रेडिमेड कपड्यांच्या जमान्यात टेलरिंग व्यवसाय डबघाईला आल्याने पारंपरिक व्यावसायिक विवंचनेत सापडले आहेत.रेडिमेडच्या जमान्यात देखील टेलरिंग व्यवसाय तग धरून होता. अचूक मापाचे हवेतसे मनपसंद कपडे शिवायची आवड निराळीच होती. तसेच जशी नवी फॅशन येईल त्यानुसार कपडे शिवले जायचे. मात्र आता काळ बदलला आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागात टेलरिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. शाळा बंद व लग्नसोहळे कमी यामुळे मोठा हंगाम निघून गेल्याने हा व्यवसाय अक्षरशः डबघाईला आला आहे.एकेकाळी शिवणकला घराघरात शिकली जायची. मुलींनी शिवणकलेचे शिक्षण घ्यावे, असा त्यांच्या आईवडिलांचा आग्रह असायचा. उपजीविकेचा कोणताच पर्याय नसेल तर शिवणकाम करणाऱ्या मुलीला निदान स्वत:च्या पायावर तरी उभे राहता येईल, अशी अपेक्षा आईवडिलांची असायची. परंतु काळ बदलला आणि सर्वच काही बदलले. आज शिवणकाम शिकणे म्हणजे कमीपणाचे लक्षण वाटू लागल्याने त्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे.टेलरिंगच्या व्यवसायात आज मराठी माणूस जेमतेम औषधाला सापडेल अशी अवस्था आहे. एकेकाळी शर्ट साडेतीन, तर पँट दहा ते पंधरा रुपयांत शिवून मिळत होती. परंतु, आज तो शर्ट दोनशे ते तीनशे रुपये, तर पँट तीनशे ते साडेचारशे रुपयांना शिवून मिळत आहे. महागाईमुळे शिलाईचे दरही वाढले आहेत. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांत तयार कपड्याचा व्यवसाय तेजीत आला आहे. परिणामी आज कपडे शिवण्याचा कलही कमी झाला आहे. रेडिमेडचा जमाना असला तरी नेहमीचे ग्राहक जुन्या टेलर मास्टरची गुणवत्ता पाहून त्यांच्याकडे येतात. परंतु ते कधी मिळतील याची तारीख सांगता येत नाही.रेडिमेड कपड्यांच्या कारखान्यांमध्ये एक शर्ट किंवा पँट शिवण्यासाठी सात ते आठ कामगारांचा हातभार लागत असतो. कॉलरमेकर, कफमेकर, कफ अटेचर आदी वेगवेगळे कामगार असतात. एका मापाचे हजारो शर्ट, पँट ते तयार करीत असतात. परंतु स्पेशल टेलरकडे एक कारागीर पूर्ण शर्ट आणि पँट शिवतो. त्यामुळे फिटिंगच्या बाबतीत कुठेही तक्रार येत नाही. परंतु आता या व्यवसायात फारसा फायदा मिळत नाही. त्यामुळेच काही व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद केले आहेत. तसेच शिवणकला शिकण्यास सहसा कोणी तयार होत नाही. परिणामी कारागीर मिळणेही बंद झाले आहे.कॅन्हॉस, बटने, अस्तर, सुई, धागा आदी साहित्यांच्या दरात वाढ झाल्याने शिलाईचे दर वाढले आहेत. पूर्वीपासून कपडे शिवून घेणारे ग्राहक नेहमीच्या टेलरकडे येतात. परंतु त्यांची मुले फॅशनेबल रेडिमेड कपडे वापरत असल्यामुळे या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यातच हल्ली विद्यार्थ्यांचा गणवेश ठराविक दुकानातून घेण्याचा आग्रह शाळांनी धरल्यामुळे त्याचा परिणामही टेलरिंग व्यवसायावर झाला आहे.

टॅग्स :businessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्या