शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलचा कारभार दोन ठिकाणी

By admin | Updated: January 16, 2016 22:19 IST

इगतपुरी : शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांत संभ्रम

घोटी : इगतपुरीच्या तहसील कार्यालयाची ब्रिटिशकालीन इमारत जीर्ण झाल्याने तहसील कार्यालयासाठी शासनाच्या वतीने दोन वर्षापासून बांधण्यात आलेली इमारत बांधकामापासून वादग्रस्त ठरल्याने महसूल विभागाने ताब्यात घेण्यास सातत्याने नकार दिला होता. सदर इमारत तयार होऊनही तिचा वापर का करण्यात येत नाही, असा सवाल विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे गेल्याने अखेर या इमारतीत कामकाज सुरू करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने, या नूतन कार्यालयात इगतपुरी तहसील कार्यालयाचा अर्धा कारभार नवीन वर्षापासून सुरू झाले आहे. मात्र काही विभागाचा कारभार अद्यापही जुन्या कार्यालयातूनच होत असल्याने शासकीय कामकाजासाठी ग्रामीण भागातून तहसील कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या कार्यालयाचे कामकाज एकाच ठिकाणी करण्यात यावे, अशी मागणी होत.इगतपुरी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेली तहसील कार्यालय आवारात पोलीस ठाणे, भूमिअभिलेख कार्यालय आदि विभाग असल्याने या इमारतीची जागा वापरासाठी अपुरी पडत होती. यामुळे तहसील कार्यालयाला स्वतंत्र व सुसज्ज कार्यालय व्हावे यासाठी आमदार निर्मला गावित यांनी पाठपुरावा करून नूतन इमारतीसाठी निधी मंजूर केला होता.दरम्यान, या इमारतीचे निर्लेखीकरण करून त्याच ठिकाणी नूतन इमारत व्हावी, असे अभिप्रेत असताना मात्र शासनाने इगतपुरी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर बोरटेंभे गावाच्या शिवारात एका डोंगराच्या पायथ्याशी इमारत बांधून आपल्या अकलेचे तारे तोडले होते. यामुळे या इमारतीचे काम गुणवत्तेचे नियम धाब्यावर बसवून करण्यात आले असल्याने इमारतीची रचना, गुणवत्ता ढासळली आहे. या इमारतीचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले असतानाही ही इमारत ताब्यात घेण्यास महसूल विभागाने नकार दिला होता.तहसील कार्यालयासाठी नवीन बांधण्यात आलेली इमारत गुणवत्ता व निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप होत याबाबत बांधकाम विभाग आणि इमारतीचे बांधकाम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला दोषी धरून कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचा तारांकित प्रश्न थेट विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. (वार्ताहर)