शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

लोंढेंच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार

By admin | Updated: January 22, 2015 00:52 IST

याचिकेवर निकाल : पालिका महासभेला निर्णय घेण्याचे न्यायालयाचे आदेश

नाशिक : सातपूरमधील प्रभाग क्रमांक २० मधील रिपाइंचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी अनधिकृतपणे उभारलेल्या संपर्क कार्यालयावर दीड वर्षापूर्वी एमआयडीसी आणि महापालिकेने पोलीस बंदोबस्तात हातोडा चालविल्यानंतर फ्रावशी अकॅडमीचे संचालक रतन लथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने लोंढे यांच्या नगरसेवकपदाच्या अपात्रतेबाबत नाशिक महापालिका महासभेने दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे प्रकाश लोंढे यांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार असून, महासभा आता याबाबत नेमकी काय भूमिका घेते त्यावर लोंढे यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी सातपूर परिसरातील आयटीआय सिग्नलजवळील एमआयडीसीच्या रस्त्यात ‘धम्मतीर्थ विहार’ या नावाखाली अनधिकृत बांधकाम करत त्यात स्वत:चे संपर्क कार्यालय थाटल्याचा आरोप रतन लथ यांनी केला होता आणि सदर बांधकाम पाडून टाकण्याबाबत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने सदर अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याचे आदेश एमआयडीसीला दिले होते. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत एमआयडीसी आणि नाशिक महापालिका यांनी दि. २८ मे २०१३ रोजी संयुक्तपणे कारवाई करत सदर अनधिकृत बांधकामांवर जेसीबी चालविला होता. त्यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सदर बांधकाम हटविताना पोलिसांना भुयारी मार्गही आढळून आल्याने पोलीसही चक्रावून गेले होते. दरम्यान, सदर अनधिकृत बांधकाम हटविल्यानंतर रतन लथ यांनी अतिक्रमण प्रकरणी प्रकाश लोंढे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. परंतु पालिकेने दखल न घेतल्याने अखेर लथ यांनी पुन्हा एकदा आॅगस्ट २०१३ मध्ये उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायमूर्ती श्रीमती नाईक व न्यायमूर्ती सी. व्ही. भडांगे यांच्यापुढे सदर प्रकरणाची सुनावणी झाली असता न्यायालयाने प्रकरण गांभिर्याने घेत तत्कालीन पालिका आयुक्तांवर ताशेरे ओढले; शिवाय सर्व परिस्थितीचे आकलन करून आयुक्तांनी महापालिकेच्या महासभेपुढे सदर प्रकरण ठेवावे आणि महासभेने दोन महिन्यांत निर्णय घ्यावा, असे आदेश काढल्याची माहिती लथ यांचे वकील अ‍ॅड. तुषार सोनवणे यांनी दिली. (प्रतिनिधी)