शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण तलाव २ आॅगस्टपासून खुले

By admin | Updated: July 16, 2016 00:19 IST

महापौरांचा निर्णय : सद्य:स्थितीत सकाळच्या सत्राला परवानगी

 नाशिक : गंगापूर धरणातील पाणीसाठा ६६ टक्क्यांवर जाऊन पोहोचल्याने महापालिकेने चार महिन्यांपासून पूर्णवेळ बंद ठेवलेले जलतरण तलाव २ आॅगस्टपासून खुले करण्याचा निर्णय घेतला असून तशी घोषणा महापौर अशोक मुर्तडक यांनी शुक्रवारी केली. सद्य:स्थितीत सकाळच्या सत्रालाच परवानगी देण्यात आली असून, पाणीस्थितीचा आढावा घेऊन नंतर पूर्णवेळ जलतरण तलाव खुले करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. शहरात पाणीकपात सुरू असतानाच राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या सूचनेनुसार महापालिकेने आपले पाचही जलतरण तलाव दि. २१ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेने नाशिक पश्चिम विभागातील वीर सावरकर तरण तलाव, नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय तरण तलाव, सिडकोतील स्वामी विवेकानंद तरण तलाव, सातपूर येथील क्लब हाउसमधील तरण तलाव आणि पंचवटीतील श्रीकांत ठाकरे तरण तलाव पूर्ण वेळ बंद ठेवले होते. महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१५ पासून शहरात एकवेळ पाणीपुरवठ्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली, त्याचवेळी मनपाच्या पाचही तरण तलावातील सायंकाळचे सत्र बंद करण्यात आले होते. केवळ सकाळचे तीन सत्र चालविले जात होते. त्यानंतर २२ फेबु्रवारीपासून विभागवार जलशुद्धीकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने दर सोमवारी साप्ताहिक सुटीसह दोन दिवस तरणतलाव बंद ठेवण्यात येत होता. मात्र, धरणातील पाणीसाठ्यात होत चाललेली घट लक्षात घेता पूर्णवेळ तरण तलाव बंद ठेवण्याच्या सूचना जलसंपदामंत्र्यांनी केल्या होत्या. गेल्या चार महिन्यांपासून त्याची अंमलबजावणी सुरू होती. सदर तरण तलाव बंद ठेवण्यात आल्याने प्रतिदिन सुमारे सव्वा लाख लिटर्स पाण्याची बचत झाल्याचा दावा महापालिकेने केला. आता गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने महापौरांनी दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द केली असून त्यापाठोपाठ जलतरण तलावही २ आॅगस्टपासून खुले करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (प्रतिनिधी)