शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय तृतीयेच्या सणाला मधुर आमरसाची गोडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:13 IST

नाशिक : आमरस, मांडा, सांजोरी, पुरी, भाजीच्या साग्रसंगीत भोजन आस्वादाने अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताची गोडी वाढविली. खान्देशात आखाजी म्हणून ...

नाशिक : आमरस, मांडा, सांजोरी, पुरी, भाजीच्या साग्रसंगीत भोजन आस्वादाने अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताची गोडी वाढविली. खान्देशात आखाजी म्हणून साजरी होणारा अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या सणाला माहेरवाशिणी माहेरी येण्याची परंपरा असली, तरी यंदा लॉकडाऊनमुळे सर्व गृहिणींना सासरीच राहून अक्षय तृतीया साजरी करावी लागली.

आखाजीनिमित्त बहुतांश घरांमध्ये करा-केळीचे पूजन करण्याची परंपरा आहे. मात्र, निर्बंधांमुळे अनेकांना करा-केळीचे लहान माठ आणणे शक्य न झाल्याने, गृहिणींनी घरातील कलशात पाणी भरून पूजन केले, तसेच या सणाच्या निमित्ताने नागरिकांनी आपापल्या प्रियजनांना व्हॉट्सॲपवर शुभेच्छांचे आदानप्रदान केले. सलग दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा दुसऱ्या वर्षीही अक्षय तृतीया केवळ घरांमध्येच साजरी झाली. पुरातन संस्कृत ग्रंथातील संदर्भानुसार हा परशुराम अवतार झाला. या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णू यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्विकता वाढते. या कालमाहात्म्यामुळे या तिथीस पवित्र स्नान, दान यांसारखी धर्मकृत्ये केल्यास त्यांच्यामुळे आध्यात्मिक लाभ होतो. या तिथीस देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय होते. म्हणून या दिवशी अन्नदानासह अन्य दानधर्म करण्याचीही परंपरा आहे. मात्र, यंदाही निर्बंधामुळे नागरिकांना ते शक्य झाले नाही. मात्र, यंदाही आपत्धर्म म्हणून अनेक निर्बंध असल्यामुळे अक्षय तृतीयेचा सण नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा आल्या.

इन्फो

पुन्हा झोक्यांविना आखाजी

पूर्वापार गावागावांमध्ये नदीकाठी मुली जमून झिम्मा, फुगडी खेळणे, नाच, गाणी म्हणण्याची प्रथा असली, तरी महानगराच्या परीघातही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असल्याने, परिसरात कुठेही पारंपरिक पद्धतीने ही नाच, गाणी, झोक्यांचा खेळ रंगू शकला नाही. सण असूनही निर्बंधांमुळे कुणाला माहेरपणंच न मिळाल्याने बहुतांश गावांमध्ये झोकेच बांधले गेले नाहीत, तरीही नागरिकांनी त्यांच्या परीने घरच्या घरी सण साजरा करीत संकटकाळातही आनंदाचे क्षण शोधले.