शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमान’ने दिली भाजपाला सोडचिठ्ठी, शिवसेनेशी संगत

By admin | Updated: February 16, 2017 01:02 IST

‘स्वाभिमान’ने दिली भाजपाला सोडचिठ्ठी, शिवसेनेशी संगत

 नाशिक : राज्याच्या व केंद्राच्या सत्तेत सोबत असलेले एकेक घटक पक्ष भाजपाची साथ सोडत असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील एक गट व एक गण वगळता जिल्हा परिषदेच्या ७२ गट व १४५ गणांसाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गोविंद पगार व युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सरकारातील मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरून पक्षाचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा सुरू असतानाच स्वाभिमानीने शिवसेनेला जवळ करीत भाजपाला दणका दिला आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारातील घटक पक्षांनी या निवडणुकीत भाजपाकडे काही जागा मागितल्या होत्या. त्या न दिल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इशारा दिला होता. तथापि, भाजपाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने भाजपा विरुद्ध स्वतंत्र भूमिका जाहीर करण्यात येईल असे हंसराज वडघुले यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. दरम्यान, स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या निफाड तालुक्यातील देवगाव जिल्हा परिषद गटातून शिवनाथ जाधव व सिन्नर तालुक्यातील पांगरी गणातून रवींद्र पगार यांना उमेदवारी दिली आहे. हे दोन अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व गट व गणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. यावेळी रतन मटाले, साहेबराव मोरे, रावसाहेब पाटील, नितीन रोटे, नीलेश कुसमोडे, प्रफुल्ल वाघ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)