शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी गहाण ठेवला ‘स्वाभिमान’

By admin | Updated: July 1, 2017 01:22 IST

नाशिक : राज्यभरात शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असून, यामुळे शेतकरी कदापि कर्जमुक्त होणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यभरात शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असून, यामुळे शेतकरी कदापि कर्जमुक्त होणार नाही. त्यामुळे शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी त्यांचा स्वाभिमान गहाण ठेवला असून, एकीकडे त्यांचे प्रतिनिधी सरकारमध्ये असताना दुसरीकडे राजू शेट्टी शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा आव आणत असल्याची बोचरी टीका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सूकाणू समितीलाही संघटनेने टीकेचे लक्ष्य करीत समितीच्या सदस्यांच्या राजकीय श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांच्या मूळ प्रशांकडेच दुर्लक्ष झाल्याचा आरोप शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने शुक्रवारी (दि.३०) केला आहे. नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित शेतकरी संघनेच्या राज्यस्तरीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन संघटनेची कर्जमाफीविषयी भूमिका स्पष्ट केली. यावेळी शेतकरी नेते शंकर धोंडगे म्हणाले, एकीकडे सरकारने फसव्या स्वरूपाच्या कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांचे आंदोलन संपविण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणाऱ्या समन्वय समितीत राजकीय हेतूने प्रेरित लोकांची घुसखोरी दिसून आल्यानंतरही सुकाणू समितीत शेतकऱ्यांपेक्षा कामगारांच्या नेत्यांचाच अधिक भरणा असल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आखडते हात घेणाऱ्या सरकारच्या हस्तक्षेपामुळेच शेतीमालेचे भाव कोसळून शेतकरी कर्जबाजारी झाला असून, सरकाने कर्जवसुलीला स्थगिती देऊन शेतीमालाला हमीभाव दिला तरी शेतकरी सर्व कर्ज भरतील. परंतु, एक दीड रुपये कांदा आणि ३०-३५ रुपये तूर विकली जात असेल तर शेतकऱ्यांनी कर्ज कसे भरायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शेतकरी आंदोलनात कर्जमुक्ती आणि हमीभावासाठी उतरलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली असून, शेतकरी लढ्याला पुनरुजीवित करण्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा नव्याने लढा उभारणार असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. यावेळी रामचंद्र पाटील, गिरीधर पाटील, खेमराज कौर, सुनील पवार,भगवान बोराडे, शेखर पवार, अर्जून बोराडे, रामनाथ ढिकले, शंकर पूरकर, अनील धनवट आदि उपस्थित होते.  शेतकरी संघटनेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या लोकांचा समावेश असून, हे सर्व शरद जोशींच्या विचारांतून तयार झाले आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधरविण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत शेतमालाला रास्त भाव मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी संघटना एकत्रित आली आहे.- डॉ. गिरीधर पाटील, कृषितज्ज्ञ