शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जादा विषयांवरून संशयकल्लोळ

By admin | Updated: April 22, 2016 23:25 IST

स्थायी समिती : सभागृहाला अंधारात ठेवत विषयांना मंजुरी

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत सभापतींनी जादा विषयांचे वाचन न करताच सभागृहाला अंधारात ठेवत त्यांना मंजुरी दिल्याने संशयकल्लोळ निर्माण होऊन गदारोळ उठला. दरम्यान, स्थायीच्या सभेत डी. पी. रोड आणि न्यायालयीन निकालाशी संबंधित भूसंपादनांच्या प्रस्तावांना मंजुरी देताना उर्वरित सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचे भूसंपादनाचे प्रस्ताव तहकूब ठेवले.महापालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत भूसंपादनाचे सुमारे १३५ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी दिनकर पाटील यांनी सर्व्हे नंबर २०१ आणि २२२ मधील आरक्षित जागांच्या संपादनाची प्रक्रिया १९९९ पासून सुरू असल्याचे आणि त्याबाबत अद्याप कार्यवाही पूर्ण झाली नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. भूसंपादनाचे प्रस्ताव प्रलंबित ठेवणाऱ्या संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्याची मागणीही पाटील यांनी केली. प्रकाश लोंढे यांनी भूसंपादनाकरिता यावर्षीसाठी १२४.५० कोटी रुपयांची तरतूद असताना उर्वरित रकमेची तरतूद कोठून करणार, असा सवाल केला. यशवंत निकुळे यांनी डीपीरोड, न्यायालयीन निकाल यामुळे संबंधित भूसंपादनांचे प्रस्ताव मंजूर करणे गरजेचे असल्याचे सांगितले, तर अशोक सातभाई यांनी आरक्षित जागांचा वापर सुरू असल्याने संबंधित जमीनमालकांना मोबदला देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी यावर्षी भूसंपादनाकरिता १२४.५० कोटी रुपयांची तरतूद असल्याने तेवढी देयके देता येतील. परंतु इतर देयके एकतर थकीत राहतील किंवा जसे उत्पन्न मिळेल तशी देयके अदा करता येतील, असे सांगितले. सभापती सलीम शेख यांनी कलम १२७ अंतर्गत असलेले न्यायालयीन निकालासंबंधीचे प्रस्ताव आणि डीपीरोड संबंधित प्रस्ताव मंजूर करत उर्वरित भूसंपादनाचे प्रस्ताव तहकूब ठेवले. भूसंपादनाच्या प्रस्तावावरील निर्णय देतानाच सभापतींनी जादा विषयांनाही मंजुरी देत असल्याचे सांगत सभा गुंडाळली. जादा विषयांचे सभागृहात वाचन न करताच सभापतींनी त्यांना मंजुरी दिल्याने दिनकर पाटील, प्रकाश लोंढे, संजय साबळे, मनीषा हेकरे यांनी त्यास आक्षेप घेतला. परंतु सभापतींनी सभा संपल्याचे सांगत विरोधकांच्या गदारोळाकडे दुर्लक्ष केले आणि सभागृह सोडले. या गदारोळामुळे लक्ष्मण जायभावे यांना गढूळ पाण्यासंबंधीचा विषय मांडण्याची संधी मिळू शकली नाही. (प्रतिनिधी)