शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराचा संशय

By admin | Updated: September 8, 2016 01:45 IST

८४ हजारांची तिकिटे जप्त

 नाशिकरोड : रेल्वे तिकिटांचा काळा बाजार वाढल्याच्या अनेक तक्रारी आल्याने मुंबई रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कता विभागाच्या पथकाने सापळा रचून एका ट्रॅव्हलच्या एजंटाकडून ८४ हजाराची आरक्षित तिकिटे जप्त करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या आरक्षित व वातानुकूलित वर्गाच्या तिकिटांचा काळा बाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा दलाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कता विभागाचे निरीक्षक अतुल क्षीरसागर, भुसावळ रेल्वे गुन्हे अन्वेषण विभागाचे फरीयाद खान, महेमुद शेख, अंबिका यादव, गौरव वर्मा, महेश महाले यांनी मंगळवारी सकाळी शरणपूररोड तिबेटियन मार्केट येथे सापळा रचला होता. यावेळी पंचवटीतील लक्ष्मीवैभव टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सचा एजंट मनोज अशोक बैरागी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ८४ हजार रुपये किमतीची २६ आरक्षित आणि ई-तिकिटे जप्त करण्यात आली. याप्रकरणी नाशिकरोड रेल्वे सुरक्षा दलाकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरणपूर रोड तिबेटियन मार्केट व नाशिकरोड रेल्वे स्थानक येथील आरक्षण केंद्रात एजंटांचा सुळसुळाट झाल्याने तिकिटांचा काळा बाजार वाढला आहे. एजंटांना काही रेल्वे कर्मचारी मदत करत असल्याचे बोलले जाते. तसेच याकडे रेल्वे पोलिसांचादेखील काणाडोळा होत असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)