शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जीवन प्राधिकरण कर्मचारी संघटनेचा संप स्थगित

By admin | Updated: March 11, 2017 01:26 IST

नाशिक : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीने रविवारपासून सुरू केलेला बेमुदत संप गुरुवारी रात्री उशिरा संपुष्टात आला.

नाशिक : जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तिवेतनाचे दायित्व महाराष्ट्र शासनाने स्वीकारावे, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीने रविवारपासून राज्यव्यापी सुरू केलेला बेमुदत संप गुरुवारी (दि. ९) रात्री उशिरा संपुष्टात आला. त्यामुळे शुक्रवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कामकाज पूर्ववत सुरू केले.गुरुवारी संपाच्या पाचव्या दिवशी (दि. ९) संपाबाबत राज्यस्तरावरून तोडगा न निघाल्याने संप सुरूच होता; मात्र गुरुवारी सायंकाळी उशिरा प्रलंबित मागण्यांचा विषय बुधवारी (दि. १५) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला घेण्यात येईल, या आश्वासनानुसार संप स्थगित करण्यात आला.नाशिक जिल्ह्णात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ओझर, मोहाडी, इगतपुरी, चांदवड, दहीवाळ, माळमाथा, नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेतील काही गावे, चांदवड ४२ गावे आदि पाणीपुरवठा योजना आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे राज्यात ६२०० तर नाशिकला १७५ कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या नाशिकच्या कार्यालय आवाराबाहेर संपात मुख्य अभियंता सुदर्शन कालिके, कार्यकारी अभियंता भरत वानखेडे, अभियंता अजय चौधरी, कृष्णा झोपे, राजन पवार, विलास बापसे, बी. व्ही. सोनवणे यांच्यासह कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)