शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

ग्रामसेवक शरद उबाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 15:52 IST

नांदगाव : तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील ग्रामसेवक शरद उबाळे यांच्यावर अपहार व कामातील दिरंगाईबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली.

ठळक मुद्दे ग्रामस्थांचे सत्याग्रह आंदोलन स्थगित

लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीच्या झालेल्या कथित रोजगार हमी योजनेच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी यासाठी लक्ष्मीनगर ग्रामस्थांनी सत्याग्रह आंदोलन नांदगाव पंचायत समिती समोर केले. सायंकाळी गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे पुढील चौकशीसाठी पत्र दिले व आंदोलनकर्त्यांना दहा दिवसांच्या मुदतीत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.लक्ष्मीनगरचे बाबासाहेब घाडगे, दिगंबर सोनवणे, रोहीदास उगले, भाऊसाहेब उगले, रघुनाथ ऊगले, गंगाधर ऊगले आदी ग्रामस्थांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शरद उबाळे यांनी चौदाव्या वित्त आयोगाचे दप्तर अपुर्ण व त्यामध्ये ४,२०,३८५ रुपयांचा अपहार, वित्त आयोगातून स्वतःच्या नावाने चेक काढणे, ग्रामनिधी कॅशबुक अपूर्ण, मासिक सभेचे प्रोसेडिंग बुक अपूर्ण तसेच कामातला हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर म्हणून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी उबाळे यांना निलंबित केले. अनेक महिन्योत लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीची मासिक सभा झाली नसल्याने गावाचा विकास थांबला आहे, अशी तक्रार आंदोलकांनी केली आहे.