शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पेठ बालेकिल्ल्यातच महायुतीची पिछेहाट झाल्याने आश्चर्य

By admin | Updated: May 24, 2014 12:09 IST

एस. आर. शिंदे ल्ललोकसभा निवडणुकीत देश ‘मोदीमय’ झाला असताना पेठ तालुक्यात मात्र मोदी लाटेचा परिणाम दिसून आला नाही.

एस. आर. शिंदे ल्ललोकसभा निवडणुकीत देश ‘मोदीमय’ झाला असताना पेठ तालुक्यात मात्र मोदी लाटेचा परिणाम दिसून आला नाही. भाजपाचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांना तालुक्यात पिछाडीवर रहावे लागले आहे़ पेठ तालुका तसा महायुतीचा बालेकिल्ला समजला जातो़ पेठ-दिंडोरीची आमदारकी शिवसेनेकडे आहे़ पेठ तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद गटांवर सेनेचे वर्चस्व आहे़ पंचायत समितीत चार पैकी दोन सदस्य सेनेचे असल्याने सभापतिपदही शिवसेनेच्या ताब्यात आहे़ कोहोर जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपाच्या मदतीने जागा खेचून आणली़ असे असतानाही चव्हाण यांना पेठ तालुक्यातून केवळ १३ हजार २०६ मते मिळू शकली़ ही विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी की विरोधी पक्षांचे ‘अर्थ’कारण यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत़ चव्हाण यांना मागील लोकसभा निवडणुकीतही पेठ तालुक्याने केवळ सात हजार मते बहाल केली होती़ त्यावेळी राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळ उमेदवार होते़ झिरवाळांचे पेठ तालुक्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि नातेसंबंधाच्या जोरावर ही मते मिळू शकली असे म्हटले जात असे़ यावेळी मात्र डॉ़ भारती पवार या अगदीच नवख्या उमेदवार असताना त्यांना तालुक्यातून २५ हजार ४८ मतदारांनी स्वीकारले आहे़ चव्हाण यांची मतांची आकडेवारी सात हजारांवरून तेरा हजारांवर पोहचली ही केवळ शिवसेनेची कामगिरी असल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात येत असून, निवडणुकीच्या काळात चव्हाण यांनी पेठ तालुक्याकडे फारसे लक्ष दिले नसल्याचेही बोलले जाते़ प्रारंभी चव्हाणांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले मनसेच्या तालुक्यातील नेते व कार्यकर्त्यांनी महायुतीची साथ सोडल्याचे दिसून आले़ सर्वच निवडणुकांमध्ये या तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व दिसून येत असताना भाजपाची पक्षबांधणी मात्र तोकडी पडल्याची जाणीव या निवडणुकीत झाली़ राष्ट्रवादीने आदिवासी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे सांगितले जाते़ त्यामुळे प्रचारादरम्यान पेठ तालुक्यात क्वचितच दिसणार्‍या भारती पवार यांना पंचवीस हजार मते कशी मिळाली यावर आता सेना भाजपाच्या गोटात खल सुरू आहे़