शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्यात सोमवार ते गुरुवारफक्त अत्यावश्यक सेवाच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 16:58 IST

सुरगाणा : शहरासह तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत सोमवार ते गुरुवार हे चार दिवस सकाळी ८ ते ४ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देतहसिल कार्यालयात अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या व्यावसायिकांची बैठक

सुरगाणा : शहरासह तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत सोमवार ते गुरुवार हे चार दिवस सकाळी ८ ते ४ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.शहर व तालुका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसिलदार किशोर मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालयात अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चर्चेअंती त्यावर उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा ही सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत सुरू ठेवावी. बारा वाजता दुकाने बंद करण्याचे आवाहन यावेळी तहसिलदार मराठे यांनी केले.त्यास उपस्थित सर्व व्यावसायिकांनी प्रशासन जो निर्णय घेईल ते मान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे बैठकीत सर्वानुमते घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सुरगाणा शहरात सोमवार ते गुरुवार सकाळी ८ ते १२ यावेळेत अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार आहे. तर शुक्रवार, शनिवार व रविवार हे तीन दिवस मेडिकल व दवाखाने वगळता इतर व्यवसाय बंद राहणार आहेत.तालुक्यात देखील याचप्रकारे व्यवसाय चालू व बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देऊन कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी आरोग्य विभाग, पोलिस व महसूल प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मराठे यांनी यावेळी केले.याप्रसंगी बाऱ्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे, सुरगाणा येथील सहायक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे किराणा व्यापारी पवन कोरीमुथा, बाळकृष्ण संधानशिव, धर्मेंद्र पगारिया, संतोष बागुल, विलास कुंमट, मोना पगारिया, सोना पगारिया आदींसह निलेश खरोटे, कैलास बत्तासे, सुनिल पवार, चेतन संधानशिव, विठ्ठल थोरात आदी व्यावसायिक उपस्थित होते.सुरगाणा येथे कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दुकानांची वेळ ठरवून देण्याबाबत तहसिलदार किराणा व्यापारींशी चर्चा करताना तहसिलदार किशोर मराठे. समवेत सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे. (१८ सूरगाणा १)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या