शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

झिरवाळांच्या पुत्रासह सूनबाई बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:26 IST

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भाग असलेल्या ननाशी परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत नवोदित उमेदवारांनी ...

ठळक मुद्देवनारे ग्रामपालिका : धनराज महाले यांच्या बंधूंचीही अविरोध निवड

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भाग असलेल्या ननाशी परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत नवोदित उमेदवारांनी बाजी मारली आहे तर काही ठिकाणी जुने आणि नवे असे संमिश्र निकाल लागले आहेत. दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे सुपुत्र दीपक झिरवाळ आणि स्नुषा वैशाली झिरवाळ यांची वनारे ग्रामपालिकेसाठी तर वारे ग्रामपंचायतीत माजी आमदार धनराज महाले यांचे बंधू यादव महाले यांची बिनविरोध निवड झाली आहे. यंदा परिसरातील ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या झाल्या असून, बहुतांश ठिकाणी अत्यंत काठावर निकाल लागले असल्याचे चित्रही पाहावयास मिळाले. दरम्यान, यावेळी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला होता. हा वाढलेला मतदानाचा टक्का काही ठिकाणी नवोदित उमेदवारांना विजयाच्या समीप घेऊन गेला तर काही ठिकाणी हाच वाढलेला टक्का प्रस्थापिताना हादरवून गेला.ननाशी परिसरातील गांडोळे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग १ मधून भरत भोये, पुष्पा देशमुख, मीरा भोये, प्रभाग २ मधून अंबादास गावित, गंगाधर भोये, रूक्मिणी शिंदे, प्रभाग ३ मधून सुरेश भोये, हौसाबाई भोये, शकुंतला भोये हे विजयी झाले आहेत. बाडगीचापाडा येथे प्रभाग १ मधून जगदीश गावित, रोहिणी गावित, प्रभाग २ मधून सोमनाथ हिंडे, लता पवार, लीला हिंडे, प्रभाग ३ मधून सुदाम पवार, पल्लवी पवार हे विजयी झाले आहेत. आंबाडमध्ये प्रभाग १ मधून मधुकर चौधरी, विमल चौधरी, काशीबाई गायकवाड, प्रभाग २ मधून दत्तू गायकवाड, मच्छीन्द्र शेखरे, प्रभा शेखरे, प्रभाग ३ मधून तानाजी गावित, वैशाली गायकवाड, तुळसा गायकवाड विजयी झाले आहेत. महाजे ग्रामपालिकेत प्रमोद कोंगे, विजय कोंगे, आशा गुंबाडे, प्रभाग २ मधून वसंत भोये, जिजाबाई भोये, रुपाली भोये तर प्रभाग ३ मधून सावळीराम भुसारे हे विजयी झाले आहेत. याच प्रभागातून कविता इंगळे आणि कमळाबाई भुसारे या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.पिंपळगाव धूममध्ये प्रभाग १ मधून धनाजी काशीद, सुनीता बेझेकर, चंद्रभागा बेझेकर, प्रभाग २ मधून राजू गायकवाड, कापसाबाई गायकवाड, प्रभाग ३ मधून राकेश गुंबाडे हे विजयी झाले आहेत तर याच प्रभागातून नंदा गायकवाड यांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे. वणी खुर्दमध्ये प्रभाग १ मधून सिकंदर जाधव, रोहिदास रहेरे, संगीता धुळे, प्रभाग २ मधून केशव गावित, निर्मला शेवरे, आशा रहेरे तर प्रभाग ३ मधून राहुल ढगे, सरला चौधरी, ललिता चौधरी हे विजयी झाले आहेत. दरम्यान जोरण येथील निवडणूक यावेळी बिनविरोध झाली आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक