शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

देवळा तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली

By admin | Updated: May 12, 2017 23:16 IST

खामखेडा : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेस रस्ते ओस दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामखेडा : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेस रस्ते ओस दिसून येत आहेत. चालू वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने साधारण फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत बऱ्यापैकी थंडी होती. मार्च महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली होती. परंतु गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून अचानक वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण तयार होऊन उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने प्रचंड प्रमाणात उकाडा होत आहे. सकाळी ८ वाजेपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन कामकाज बदललेले दिसून येत आहे. सध्या सर्वत्र शेतीची हंगामातील कामे अंतिम टप्प्यात आहेत. विशेष म्हणजे, उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम जवळपास संपला असून, कांदा चाळीत साठवणुकीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने शिवारात सर्वत्र कांदा साठवणुकीचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. खामखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीतील उष्णता बाहेर निघून उकाडा निर्माण झाल्यानेघरात बसणे मुश्कील झाले आहे. गायी, बकऱ्या, मेंढ्या चारणारे गुराखी सकाळी लवकर आपली जनावरे चारण्यासाठी नेऊन दुपारी नदीकिनारच्या किंवा शेतातील झाडाच्या सावलीत आपली शेळ्या, मेंढ्या आदी जनावरे उभे करून आराम करणे पसंत करत आहेत.कडक उन्हामुळे शिवारातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. या कडक उन्हामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासू लागली आहे. सकाळी पिकांना पाणी भरल्यानंतर या कडक उन्हामुळे सायंकाळी जमीन कोरडी दिसून येत आहे. तेव्हा पिके कशी जतन करावी, हा प्रश्न आतापासून शेतकऱ्याला पडला आहे.