शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या

By admin | Updated: March 24, 2017 00:43 IST

नाशिक : मालेगाव तालुक्यातील दोघा शेतकऱ्यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.

 नाशिक : केंद्र व राज्य सरकारकडून कर्जमाफी होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याने जिल्ह्णात शेतकरी आत्महत्त्येचे प्रमाण वाढले असून, सिन्नर तालुक्यात दोघा शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येनंतर बुधवारी मालेगाव तालुक्यातील दोघा शेतकऱ्यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. नवीन वर्षापासून जिल्ह्णात चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या असून, त्यातील सहा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. महादू कारभारी पवार (५५) रा. सौंदाणे व जगन विठ्ठल अहिरे (५०) रा. डोंगरगाव असे या दोघा शेतकऱ्यांची नावे आहेत. राहत्या घरातच या दोघांनी विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपविल्याचा प्राथमिक अहवाल मालेगाव तहसील कार्यालयाने कळविला आहे. दोन दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यातील शिवाजी बोडके रा. सोनगिरी व अरुण सोनकांबळे रा. शिवडे या दोन्ही शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येने जिल्ह्णात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शासनाकडून कर्जमाफी होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत होते. परंतु राज्याच्या व केंद्राच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद ठेवलेली नसल्याने शेतकरी वर्ग निराश झाला व त्यातून आत्महत्त्येच्या घटना वाढल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी आत्महत्त्या समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नऊ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यावर आलेल्या चौकशी अहवालाचा विचार करता सहा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला, तर तीन प्रकरणे नामंजूर करण्यात आली.