शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने केली तीन मुलांसह आत्महत्त्या

By admin | Updated: September 4, 2014 00:33 IST

शेतकऱ्याने केली तीन मुलांसह आत्महत्त्या

 

दिंडोरी : पती-पत्नीच्या कौटुंबिक वादानंतर दोन मुली व मुलाला दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथील एका शेतकऱ्याने मॅक्झिमो गाडीतून गणपती दाखवायला घेऊन जात गाडी पेठ रस्त्यालगतच्या रासेगाव शिवारातील एका खोल तलावात टाकत आत्महत्त्या केल्याचे उघड झाले असून, गाडीसह सर्व मृतांचे देह तलावाबाहेर काढण्यात आले आहेत.याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती असी की, तालुक्यातील जांबुटके येथील दिनकर भगवंत अपसुंदे (४०) यांचे पत्नीसोबत नेहमीच कौटुंबिक वाद होत होते. तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. पत्नी अनिता ही दवाखान्यात गेली असताना दिनकर अपसुंदे याने मुलांना गणपती दाखवायला घेऊन जात असल्याचे सांगत मुलगा योगेश (१६), मुली वैशाली (१७), श्रद्धा ऊर्फ जिजा (७) यांच्यासह नवीन महिंद्रा मॅक्झिमो ही गाडी घेऊन नाशिकला गेले होते.एक दिवस त्यांनी नाशिकला मुक्काम करत दुसऱ्या दिवशी मुलांना नवे कपडे घेत ते कपडे घालूनच मुलांसह जीवनयात्रा संपवली.दरम्यान, मंगळवारी (दि. २) दुपारी योगेश याचा मृतदेह नाशिक येथील पेठ रस्त्यानजीक रासेगाव शिवारातील एका तलावात आढळल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस तपासात तलावात दिनकर यांचे पॅन कार्ड सापडल्याने इतर तिघेही तलावात असल्याचे संशयाने पोलिसांनी तत्काळ नाशिकला अग्निशमन दलाला पाचारण करत रात्री उशिरापर्यंत शोध घेतला मात्र काहीही आढळले नाही. आज (बुधवारी) सकाळी तलावात मोठी मुलगी वैशाली हिचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्यानंतर दिंडोरी पोलिसांनी पुन्हा अग्नीशमन दलाला तेथे पाचारण करत तपास कार्य सुरु केले. या पथकाने गळ टाकत शोध घेताच सुरवातीला दिनकर यांचा मृतदेह सापडला तर लहानगी श्रद्धा हिचाही मृतदेह शोध पथकाने शोधून काढला. मोठी क्रेन मागवत गाडीही बाहेर काढण्यात आली . दिंडोरी ग्रामीण रुण्णालयात शव विच्छेदन करण्यात येवून जांबूटके येथे तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक मोहिते पोलीस उपाधिक्षक संजय गुंजाळ यांनी भेट देत तपासकामी सूचना दिल्या. दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय शुक्ला, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख, हवालदार बोरसे, मोगल आदि तपास करत आहे.दरम्यान दिनकर अपसुंदे याच्या पहिल्या पत्नीने दहा वर्षापूर्वी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त असून अनिता हि त्याची दुसरी पत्नी होती. पहिल्या पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी दिनकर वर दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. पहिल्या पत्नीची योगेश व वैशाली हि मुले तर श्रद्धा हि दुसऱ्या पत्नीची मुलगी होती.दिनकर ने जमिनीवर बँकेचे कर्ज घेतले होते, त्यावर त्याने जमीन विकत कर्जाची परतफेड करून दुधाचा व्यवसाय सुरु केला होता तर नव्यानेच मॅक्झीमो हि प्रवासी गाडी घेतलेली होती. त्याला दारूचे व्यसनही असल्याची चर्चा होती. त्यातूनच पती-पत्नीत वारंवार भांडण होत असल्याचे समजते. दरम्यान आत्महत्येपूर्वी दिनकर याने सर्व मुलांना नवे कपडे घेत गाडीतून नासिक दाखवूून आणले नवीन कपडे घातलेले खुशीत असलेल्या मुलांना आज आपला मृत्यू येणार आहे. याची कल्पना मात्र दिनकर याने स्वत:सह मुलांनाही तलावात बुडवत आपली जीवनयात्रा संपवली.