शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सोनगाव येथील विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:15 IST

पाेलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनगाव येथील सोमनाथ सुकेणकर यांची मुलगी वैष्णवी हिचा विवाह गावातील नितीन कर्पे यांच्या सोबत ...

पाेलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनगाव येथील सोमनाथ सुकेणकर यांची मुलगी वैष्णवी हिचा विवाह गावातील नितीन कर्पे यांच्या सोबत ८ मार्च २०२० रोजी झाला. कर्पे कुटुंब नोकरीनिमित्ताने नाशिक येथे राहते. नितीन इंजिनियर असून तो पुणे येथे आयटी कंपनीत नोकरी करतो. लॉकडाऊन असल्यामुळे तो जवळपास अनेक दिवसांपासून नाशिक येथे कुटुंबासोबत राहत आहे.

वैष्णवी खेड्यातील आहे, तिला काम येत नाही, ती गावंढळ आहे, असे म्हणत पती नितीन, सासू, नणंदा, नणंदाचे पती हे वारंवार त्रास देत होते. त्रासाला कंटाळून काही महिन्यांपूर्वी वैष्णवी माहेरीदेखील आली होती. त्यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक विजय कारे, सरपंच अंकुश गायकवाड यांनी पुढाकार घेऊन पुन्हा सासरच्या माणसांना समज देऊन वैष्णवीला सासरी पाठवले होते.

नणंद रोशना शिंदे व तिचे पती अभिजित शिंदे, दुसरी नणंद प्रिया कदम व तिचे पती महेश कदम हे घरी येऊन वारंवार वैष्णवीच्या तक्रारी तिचा पती नितीन यांच्याकडे करत असत. त्यांचे ऐकून नितीन तिला वारंवार मारहाण करत असे, सासरकडून पैसे आणायला सांगत असे, वैष्णवीचा शारीरिक, मानसिक छळ झाल्यामुळे ती मनाने खचली होती. त्यामुळे तिचा घातपात झाला असून तिची आत्महत्या केली असा बनाव कुटुंबाने रचला असल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. बी. पवार करत आहेत.