शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बसखाली चिरडून बालक ठार

By admin | Updated: October 8, 2015 00:07 IST

पंचवटी येथील घटना : संतप्त नागरिकांनी बस फोडली; रास्ता रोको आंदोलन; पोलिसांचा लाठीमार

पंचवटी : शाळेतून नातवंडांना घराकडे पायी घेऊन जाणाऱ्या आजी व दोघा नातवांना शहर बसने धडक दिल्याने बसच्या चाकाखाली सापडून गणेशवाडीतील रोनित अश्विन चौहान या अडीच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दुपारी सव्वा बारा वाजता सेवाकुंज येथील संकटमोचन हनुमान मंदिरासमोर हा अपघात घडला. अपघातात जखमी झालेल्या संगीता नंदकुमार चौहान (५०) या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, अपघातानंतर संतप्त जमावाने रास्ता रोको केले. गणेशवाडी परिसरात राहणाऱ्या अश्विन चौहान यांचा अडीच वर्षाचा मुलगा रोनित व मुलगी जीविका चौहान असे दोघे पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या हरिबाई देसाई मॉँटेसरी शाळेत शिक्षण घेत आहेत. बुधवारी शाळा सुटल्यानंतर त्यांची आजी संगीता चौहान या दोघांनाही शाळेतून घेऊन घराकडे येत असताना सेवाकुंजजवळ निमाणी बसस्थानकाकडून पंचवटी आगारकडे भरघाव जाणाऱ्या बसने (एम. एच. १२ इएफ ६०९०) त्यांना जबर धडक दिली. यात रोनित हा मागच्या चाकाखाली चिरडला गेला तर आजी बसखाली अडकल्या. जीविका ही सुदैवाने बाजूला फेकली गेल्याने बचावली. बसच्या चाकाखाली सापडल्याने रोनित व आजी या दोघांनाही तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र तेथे उपचार सुरू असताना रोनितचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याची वार्ता पसरताच शेकडोंच्या जमावाने नागरिक रस्त्यावर जमा झाले आणि त्यांनी रास्ता रोको करून बसच्या काचा फोडून वाहतूक पोलीस शाखेचा निषेध नोंदविला. परिस्थिती हाताबाहेर असल्याने पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, उपआयुक्त एन. अंबिका आदिंसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी रास्ता रोको केल्याने सुमारे दोन तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. (वार्ताहर)