शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या मृत्यूचा बनाव करणारा संशयित शरण

By admin | Updated: July 4, 2017 00:08 IST

विम्याच्या रकमेसाठी रचला होता बनाव

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अपघाती मृत्यूनंतर मिळणाऱ्या विम्याच्या चार कोटी रुपयांसाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचणारा प्रमुख संशयित रामदास पुंडलिक वाघ हा अखेर पोलिसांना शरण आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जव्हार-त्र्यंबकेश्वर रोडवरील तोरंगण घाटात संरक्षक भिंतीजवळ ९ जून रोजी मृतदेह आढळून आला होता. अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला होता़ मृतदेहाच्या कपड्यांची तपासणी केल्यानंतर त्यात एचडीएफसी व महिंद्रा कोटक बँकेचे एटीएम कार्ड आणि लाईट बिल आढळून आले. तसेच एमएच १५ डीटी ८५३ क्रमांकाची सीबीझेड एक्स्ट्रिम दुचाकीही आढळून आली होती़ या कागदपत्रांवरून रामदास पुंडलिक वाघ (३९, रा. तांगडी शिवार, ता. चांदवड) यांचा हा मृतदेह असल्याचे समोर आले़वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनानंतर दिलेल्या अहवालात गळा आवळून तसेच डोक्यात, तोंडावर टणक हत्याराने वार केल्याने वाघ यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले व त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोथ घेण्यासाठी वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले व त्यांच्या पथकाने वेळोवेळी रामदास वाघ व त्याचे मित्र, नातेवाईक यांच्याकडे तपास केला. त्याचबरोबर त्याच्या आप्तस्वकियां-कडेही शोध घेतला. अखेर नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस स्टेशनला जाऊन त्याने शरणागती पत्करली.पोलिसांमुळे बनाव उघडचाणाक्ष ग्रामीण पोलिसांच्या तपासामुळे या प्रकरणातील बनाव उघडकीस आला. या घटनेतील चौघा संशयितांनी मृतदेहासाठी एका हॉटेल कर्मचाऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह त्र्यंबकेश्वर रोडवरील अंबाई शिवारातील तोरंगण घाटात ठेवून अपघाताचा बनाव रचला होता़ ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील तिघा संशयितांना यापूर्वीच अटक केली असून, मुख्य संशयित रामदास वाघ याचा पोलीस शोध घेत होते.