शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना वाटणार सहा हजार लाडू

By admin | Updated: August 15, 2014 00:33 IST

विद्यार्थ्यांना वाटणार सहा हजार लाडू

 घोटी : देशभर ६८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यासाठी संपूर्ण भारतवासीय सज्ज झालेले असताना घोटीतील एक कुटुंब गेल्या चार दिवसांपासून एका अनोख्या उपक्रमासाठी अहोरात्र राबत असल्याचे दिसत आहे.या कुटुंबातील एका युवकाचे दोन वर्षांपूर्वी देशाच्या स्वातंत्र्यदिनी अपघातात निधन झाले होते. मात्र हे दु:ख उराशी न बाळगून एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने देशाच्या स्वातंत्र्यदिनी त्याच्या स्मरणार्थ शाळकरी मुलांना मिष्टान्नाचे वाटप करावे, अशी संकल्पना घरातील व्यक्तींनी मांडली आणि या संकल्पनेस घरातील सर्व सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या वर्षापासून दर स्वातंत्र्यदिनी सर्व शाळेत लाडू आणि चॉकलेटवाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे सर्व कुटुंब गेल्या आठवड्यापासून शुद्ध तुपातील लाडू करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.घोटी येथील टोल नाका परिसरात शहरातील ज्ञानेश्वर बजरंग भोर यांचे साईश्रद्धा नामक हॉटेल आहे. ज्ञानेश्वर यांचा लहान भाऊ भाऊसाहेब यांचे दोन वर्षांपूर्वी नांदगावसदो फाट्यावर अपघाती निधन झाले. त्यांच्या या अपघाती मृत्यूने भोर कुटुंब पूर्णपणे कोसळले. मात्र त्यातून सावरत त्यांनी भाऊसाहेब यांच्या स्मृती जतन करण्याचा वेगळाच प्रयत्न केला. त्यासाठी भाऊसाहेब यांच्या स्मृतिदिनी विविध सेवाभावी उपक्रम राबवून त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला.मात्र देशप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा ही जोपासत त्यांनी भाऊसाहेबच्या वयातील मुलांना देशाचा स्वातंत्र्यदिन आनंदात साजरा करावा व या मुलांना मिष्टान्न मिळावे या उद्देशाने भोर कुटुंबीयांनी आपल्या व्यवसायाकडे काणाडोळा करीत याच हॉटेलात शुद्ध तुपापासून लाडू बनविण्यासाठी सुरुवात केली असून, उद्या घोटीतील सर्व शाळेतील मुलांना त्याचे वाटप केले जाणार आहे. एकीकडे घरातील कर्ता मुलगा गेल्याने डोळ्यात आसू, तर दुसरीकडे देश स्वतंत्र होऊन ६८ वर्ष उलटली म्हणून हसू अशा अवस्थेत हे कुटुंब भाऊसाहेब यांच्या स्मृती जपत लाडू बनविण्यात गर्क असल्याचे दिसत होते. (वार्ताहर)