शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी रंगले चित्रपटातील गाणी पाहण्यात

By admin | Updated: December 8, 2015 23:22 IST

शिक्षकांचे दुर्लक्ष : पदाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात नळवाडी शाळेतील प्रकार

सिन्नर : जिल्हा परिषद व सिन्नर पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या पाहणी पथकाने अचानक नळवाडी येथील प्राथमिक शाळेला भेट दिली असता, विद्यार्थी संगणकावर चित्रपटातील गाणी पाहण्यात दंग असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेची पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून, शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती व विद्यमान सदस्य राजेश नवाळे, पंचायत समितीच्या सभापती संगीता काटे, उपसभापती राजेंद्र घुमरे, सदस्य रामदास खुळे, विजय काटे, नवनाथ मुरडनर यांच्या पथकाने अचानक तालुक्यातील नळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस भेट दिली. यावेळी शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी संगणकावर चक्क हिंदी चित्रपटातील गाणी पाहण्यात दंग असल्याचे दिसून आले. नळवाडी येथील प्राथमिक शाळेला माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कारखान्याने पाच संगणक भेट दिले आहेत. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी सदर कारखान्याने सुमारे एक लाखाहून अधिक किमतीचे संगणक दिले आहेत. या संगणकात हिंदी चित्रपटातील गाण्यांचे व्हिडीओ कोणी टाकले, याबाबत शिक्षकांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. शाळेत झालेल्या बैठकीच्या वेळी अन्य शिक्षकांनी व्हॉट्सअ‍ॅपमधून सदर गाणी टाकले असावेत, असे उत्तर शिक्षकांनी दिले. ५३ विद्यार्थीसंख्या असलेल्या या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे चार वर्ग आहेत. या चार वर्गांसाठी दोन शिक्षक आहेत. त्यामुळे शिक्षक दोन वर्गावर असल्यानंतर दोन वर्ग विनाशिक्षक असतात. अशावेळी विद्यार्थी संगणक कक्षात जाऊन चित्रपटातील गाणी वाजवत असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना संगणकात तुम्हाला काय येते, असा प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना संगणकातील गाण्यांचे व्हिडीओ वाजवून दाखविले. या प्रकाराची पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेरेबुकात नोंद केली. त्याचबरोबर पंचायत समितीच्या शिक्षण विभागास या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)