नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तब्बल दोन वर्षांनंतर घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेला नाशिकमधील ४६ परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ११ हजार ७४८ परीक्षार्थींनी हजेरी लावली, तर तब्बल ६ हजार ३२३ जणांनी या परीक्षेला दांडी मारली. विशेष म्हणजे सकाळच्या सत्रात उपस्थित असणाऱ्या परीक्षार्थींपैकी ५३ जणांनी दुसऱ्या सत्रात परीक्षा देण्याचे टाळले.एमपीएससीतर्फे कोरोनाच्या सावटात रविवारी (दि.२१) राजपत्रित अधिकारी वर्ग अ गटातील पदांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पूर्वपरीक्षा घेण्यात आली. सकाळी ८ वाजेपासून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आल्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत प्रथम सत्रातील पेपर झाला. सकाळच्या सत्रात ११ हजार ८०१ परीक्षार्थी उपस्थित होते. तर ६ हजार २७० परीक्षार्थी गैरहजर होते. पीपीई किटसह दिली परीक्षा कोरोनाच्या सावटात शहरात हजारो परीक्षार्थी विविध परीक्षा केंद्रांवर देत असताना नाशिकरोड येथील के. जे. महेता विद्यालयातील परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष कोरोनाची लक्षणे असलेल्या परीक्षार्थीने परीक्षा दिली. या विद्यार्थ्यासाठी परीक्षा केंद्रावर पीपीई किटची तसेच वेगळ्या वर्ग खोलीची सोय करण्यात आली होती. असे होते कोविड कीटn हॅण्डग्लोज, थ्रीलेअर मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर.
कोविड किटसह विद्यार्थ्यांनी दिली एमपीएससी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 01:21 IST
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तब्बल दोन वर्षांनंतर घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेला नाशिकमधील ४६ परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ११ हजार ७४८ परीक्षार्थींनी हजेरी लावली, तर तब्बल ६ हजार ३२३ जणांनी या परीक्षेला दांडी मारली. विशेष म्हणजे सकाळच्या सत्रात उपस्थित असणाऱ्या परीक्षार्थींपैकी ५३ जणांनी दुसऱ्या सत्रात परीक्षा देण्याचे टाळले.
कोविड किटसह विद्यार्थ्यांनी दिली एमपीएससी परीक्षा
ठळक मुद्देशहरात ४६ केंद्रे : ६ हजार ३२३ विद्यार्थ्यांनी मारली दांडी