शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष यात्रा आज नाशिक जिल्ह्यात

By admin | Updated: April 16, 2017 23:09 IST

संघर्ष यात्रा आज नाशिक जिल्ह्यात

नाशिक : विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढण्यात येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रेचे सोमवारी (दि.१७) नाशिकला आगमन होत आहे. सोमवारी व मंगळवारी ही यात्रा नाशिक जिल्ह्यात फिरून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व अन्य प्रश्नांबाबत वार्तालाप व जाहीर सभा होणार आहे. यात्रेत मालेगाव, बागलाण, चांदवड व निफाड या चार तालुक्यांत जाहीर सभा होणार आहे. या संघर्ष यात्रेत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, शेकापचे जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, आरपीआय कवाडे गटाचे प्रा. जोगेंद्र कवाडे सहभागी होणार आहेत. सोमवारी (दि. १७) १० वाजता मालेगावला मनमाड चौफुलीवर जाहीर सभा, २ वाजता नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती भेट, दुपारी २ वाजता जाहीर सभा, दुपारी ३.३० देवळा पाचकंदील त्रिफुलीवर शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.४.३० वडाळीभोई (चांदवड) येथे वार्तालाप. साडेचार वाजता पिंपळगावला जाहीरसभा, सायंकाळी ६ वाजता आडगाव (नाशिक) येथे आगमन व शेतकऱ्यांशी संवाद, मंगळवार (दि.१८) १० वाजता पत्रकार परिषद, देवळाली कॅम्प, भगुरमार्गे पांढुर्ली व शिवडा गावास भेट, २ वाजता घोटी जाहीरसभा व नंतर शहापूरकडे संघर्ष यात्रा रवाना.