शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

एकापाठोपाठ धक्के : पक्ष कार्यकर्ते धास्तावले

By admin | Updated: December 25, 2016 01:26 IST

राष्ट्रवादीची ‘छबी’ धोक्यात !

नाशिक : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आधी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ, त्यापाठोपाठ माजी खासदार देवीदास पिंगळे आणि आता बनावट नोटाप्रकरणी माजी कार्याध्यक्ष छबू नागरे गजाआड गेल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसची ‘छबी’ धोक्यात आली आहे. एकापाठोपाठ पक्षाला धक्के बसू लागल्याने सामान्य कार्यकर्ता मात्र धास्तावला आहे, तर आगामी महापालिका निवडणुकीवरही पक्षाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सन २०१६ हे वर्ष जिल्ह्यातील राजकारणात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला संकट घेऊन आले. वर्षाच्या प्रारंभीच जिल्ह्याचे भूमिपुत्र व राज्यातील हेवीवेट नेते छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यामागे बेनामी मालमत्ताप्रकरणी चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले आणि दोघेही गजाआड झाले. भुजबळ कुटुंबीयांवर आलेल्या या संकटामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसही मूळापासून हादरली आणि पक्षाला एकप्रकारे मरगळ आली. भुजबळांची उणीव भरून काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच जिल्ह्याचेच भूमिपुत्र व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्ष कार्यकर्त्यांत अधूनमधून प्राण फुंकण्याचे प्रयत्न केले, परंतु भुजबळांच्या नावाचे वलय लाभलेल्या राष्ट्रवादीच्या जहाजातून एकेकाने उड्या मारायला सुरुवात केली. त्यात काही नगरसेवकांचाही समावेश होता. भुजबळांच्या अनुपस्थितीत पक्षाचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांनीही पक्षकार्यालयात हजेरी लावण्यास सुरुवात करत अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला असतानाच नोटाबंदीच्या धावपळीत बेहिशेबी रोकडप्रकरणी पिंगळे यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले. पिंगळे प्रकरण सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी, शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा माजी कार्याध्यक्ष छबू नागरे व माजी पदाधिकारी रामराव पाटील यांना बनावट नोटा छपाईप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गेल्या वर्षभरात भुजबळांपासून नागरे-पाटीलपर्यंत सारे जण गजाआड गेले ते नोटांसंदर्भातच. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष एकदम चर्चेत आला असून, पक्षनेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथाही ऐकविल्या जात आहेत. आणखी काही नेते-कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर असल्याची चर्चा सुरू आहे. एकापाठोपाठ राष्ट्रवादीला बसलेल्या या धक्क्यामुळे एकंदर पक्षाची छबीच धोक्यात आली आहे.