शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

‘लालपरी‘मधून चक्क प्रतिबंधित मद्य वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:14 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद मिरविणाऱ्या राज्य महामंडळाच्या चाळीसगाव आगाराच्या एका ‘लालपरी’मधून चक्क राज्यात विक्रीवर निर्बंध असलेला परराज्यात निर्मित मद्यसाठ्याची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारी (दि.२२) दुपारी बारा वाजता उघडकीस आला.

नाशिक : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद मिरविणाऱ्या राज्य महामंडळाच्या चाळीसगाव आगाराच्या एका ‘लालपरी’मधून चक्क राज्यात विक्रीवर निर्बंध असलेला परराज्यात निर्मित मद्यसाठ्याची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारी (दि.२२) दुपारी बारा वाजता उघडकीस आला.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा मारून बसमधून (एम.एच. ४० एन. ९८१७) दादरा-नगर हवेलीमध्ये निर्मित मद्याच्या दहा बाटल्या जप्त केल्या. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक दक्षता सुरक्षा विभागाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन विभाग, नाशिकच्या पथकाने विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संतोष चोपडेकर, दुय्यम निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी सापळा रचला. दुपारी बसस्थानकात चाळीसगाव-सिल्वासा (नाशिकमार्गे) ही बस दाखल झाली. पथकाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता पथकाचे प्रमुख अजित भारती यांना सोबत घेऊन या बसची झाडाझडती घेतली. दरम्यान, कर्मचाºयांनी बसच्या रा.प. कर्मचाºयांकरिता राखीव असलेल्या चालकाच्या पाठीमागील रांगेतील ३५-३६ क्रमांकाच्या बाकाखालून एका पोत्यात भरलेल्या प्रतिबंधित मद्याच्या बाटल्या हस्तगत केल्या. तसेच चालकाच्या कॅबीनमध्ये असलेली एक कुलूपबंद पेटी तपासणीसाठी वाहकाकडून किल्ली घेऊन उघडली असता त्यामध्ये त्याच प्रकारच्या दोन मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. सुमारे २ हजार ९९० रुपयांचा मद्य जप्त केले. संशयावरून चालक राकेश पाटील (रा.पातोंडा, ता.चाळीसगाव), वाहक मनोज महाजन (रा.मेहुणबारे) यांना ताब्यात घेतले. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.परराज्यांमध्ये ये-जा करणाºया बसेस ‘रडार’वरगुजरात राज्यातील सिल्वासा, केंद्र शासित प्रदेश दीव-दमण, दादरा-नगर हवेली या शहरांमध्ये ये-जा करणाºया ‘एम.एस.आर.टी.सी’, ‘जी.एस.आर.टी.सी’च्या बसेसची तपासणी भरारी पथकाकडून अचानकपणे केली जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली. या बसेस आता रडारवर असून, बसेसमधून अवैधरीत्या मद्यवाहतूक होऊ नये, यसााठी भरारी पथकांना विशेष सूचना राजपूत यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागstate transportएसटी