शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:14 IST

कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रित करण्यासाठी शनिवारी(दि.१३) व रविवारी (दि.१४) अत्यावश्यक सेवा वगळता, अन्य सर्व दुकाने व व्यावसायिक आस्थापना ...

कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रित करण्यासाठी शनिवारी(दि.१३) व रविवारी (दि.१४) अत्यावश्यक सेवा वगळता, अन्य सर्व दुकाने व व्यावसायिक आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, शनिवारी (दि.१३) शहरातील शहरातील शालिमार, मेन रोड, दहीपूल, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, कॉलेज रोड, गंगापूर रोड परिसरातील इलेक्ट्रिक, कपडे, सौदर्य प्रसाधने यांसारखी व्यावसायिक दुकाने व मॉल्स पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते, तर किराणा दुकानांसह डेअरी उत्पादने व खानपानाचे हॉटेल, उपहारगृह वेळेचे निर्बंध पाळून सुरू असल्याचे दिसून आले. मात्र, यात काही प्रवाशी स्थानकांच्या परिसरातील चहा व वडापावचे स्टॉल सुरू असल्याने, या ठिकाणी ग्राहकांची वर्दळ दिसून आले. दरम्यान, प्रशासनाच्या आदेशाला शहरातील मेन रोड, दहीपूल, रविवार कारंडा, शालिमार, कॉलेज रोड, गंगापूर रोड परिसरासह पंचवटी, गंगापूर, सातपूर, अंबड, सिडको, गोविंदनगर, इंदिरानगर, मुंबई नाका, द्वारका, उपनगरसह नाशिक रोड व देवळाली भागातील व्यावसायिकांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली होती.

इन्फो-

मास्कशिवाय वावर

कोरोनाचे संकट वाढत असताना, एकीकडे प्रशासनाकडून शहरासह जिल्हाभरात कडक कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले आहेत, तर दुसरीकडे शहरातच एमजी रोड, मेन रोडसह अन्य काही भागांमध्ये तरुण मंडळी विनामास्क फिरताना, कट्ट्यांवर गप्पा मारताना दिसून आले. शहरातीतल रस्त्यांवरही अनेक दुचाकी चालकांनी हेल्मेट अथवा मास्कचा वापर केला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

इन्फो-

कोरोना संसर्ग वाढल्याने, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर करू नये, तसेच शनिवार व रविवारच्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता, अन्य व्यावसायिकांनी दुकाने उघडू नयेत, अन्यथा कारवाई केली जाईल, अशा सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून फिरत्या वाहनांमधून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, घंटागाडी व निर्जंतुकीकरणासाठी फिरणाऱ्या वाहनांमधूनही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, शहरातील सीबीएस, मेहर सिग्नल भागात ध्वनिक्षेपकांद्वारे कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याविषयी सूचना करण्यात येत आहे.

===Photopath===

130321\13nsk_15_13032021_13.jpg

===Caption===

शहरातील रस्त्यावर शुकशुकाट