शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमुक्तीसाठी १४ आॅगस्टला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:07 IST

१४ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी रास्ता रोको व रेल रोको करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी राज्य सरकारला दिलेल्या अल्टीमेटमनुसार येत्या १४ आॅगस्टपर्यंत शासनाने निर्णय न घेतल्यास १४ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी रास्ता रोको व रेल रोको करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे येथे शेतकरी सुकाणू समितीची बैठक होऊन शेतकरी कर्जमुक्तीसाठी आंदोलनाचा अखेरचा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी गेल्या १ जूनपासून सुरू झालेला शेतकऱ्यांचा संप व त्यानंतर दाखल झालेले गुन्हे तसेच नाशिक येथे राज्यव्यापी बैठकीत करण्यात आलेल्या ठरावांवरील कार्यवाहीवर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करून एकाही शेतकऱ्याला महिना उलटूनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. कर्जमाफी देताना राज्यातील शेतकऱ्यांमध्ये भेदाभेद न करता सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी यासाठी पावसाळी अधिवेशनात आमदार बच्चू कडू हे विधानसभेत तर आमदार जयंत पाटील हे विधान परिषदेत ठराव मांडतील, या ठरावाच्या बाजूने पाठिंबा देण्यासाठी सर्व पक्षीय आमदारांना आवाहन करण्यात येईल. जे आमदार किंवा मंत्री या ठरावाच्या बाजूने मतदान करणार नाहीत त्यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी फिरू देणार नाहीत, तसेच मंत्र्यांना गावबंदी करण्याचे ठरविण्यात आले. राज्यात एकाच वेळी १४ आॅगस्ट रोजी सर्व राज्य व महामार्गावर चक्काजाम करण्यात येईल, तसेच १५ आॅगस्ट रोजी जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सुकाणू समितीने घेतलेल्या या निर्णयात राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी गावोगावी आगामी काळात बैठका, मेळावे घेण्याचे तसेच शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे ठरविण्यात आले.