शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला सर्वपक्षीय रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:20 IST

शेतकºयांना वेठीस न धरता शासन व व्यापारी यांनी त्यांचा वाद परस्पर मिटवून कळवणसह संपूर्ण जिल्ह्यातील कांदा लिलाव सोमवारपासून सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी शनिवारी (दि. १६) कळवण येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनप्रसंगी दिला.

कळवण : शेतकºयांना वेठीस न धरता शासन व व्यापारी यांनी त्यांचा वाद परस्पर मिटवून कळवणसह संपूर्ण जिल्ह्यातील कांदा लिलाव सोमवारपासून सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी शनिवारी (दि. १६) कळवण येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनप्रसंगी दिला.नफेखोरीसाठी साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाºया जिल्ह्यातील व्यापाºयांविरोधी आयकर व प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईविरोधात व्यापाºयांनी बेमुदत कांदा लिलाव बंद केले आहेत. याचा फटका शेतकºयांना बसला आहे. याविरोधात आज कळवण तालुक्यातील संतप्त शेतकºयांनी व सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी पवार यांच्या नेतृत्वाखाली कळवण बसस्थानकाजवळ सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दीड तास चाललेल्या आंदोलनप्रसंगी बोलताना पवार म्हणाले की, बाजार समितीतील अचानक बेमुदत लिलाव बंद झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी कांदा निघाल्यापासून कांद्याचे भाव गडगडले आहेत. आता कुठे हजाराच्यावर विकला जात होता. तोच शासनाने व्यापाºयांवर कारवाई केल्याने पुन्हा लिलाव बंदचे हत्यार व्यापाºयांनी उपसून शेतकºयांच्या मुळावरच वार केला आहे. कांद्याचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. शासनाने व्यापाºयांना विश्वासात घेऊन तत्काळ सोमवारपासून बाजार समितीतील लिलाव सुरू करावे अन्यथा शेतकरी संघटना सोमवारी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.