शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घरात रहा सुरक्षित राहा, घराबाहेर पडू नका आमदारांची सर्वाना विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 16:31 IST

कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन यंत्रणा कार्यरत आहेत का ? औषधे व सुरक्षा साधने याची माहिती घेऊन सामाजिक अंतर ठेवून तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या भेटी घेऊन घरात राहा, सुरक्षित रहा, घराबाहेर पडू नका अशी विनंती आमदार नितीन पवार यांनी नागरिकांना करु न लॉकडाऊन काळात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवून नितीन पवार यांचा मतदारसंघात दौरा

कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन यंत्रणा कार्यरत आहेत का ? औषधे व सुरक्षा साधने याची माहिती घेऊन सामाजिक अंतर ठेवून तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या भेटी घेऊन घरात राहा, सुरक्षित रहा, घराबाहेर पडू नका अशी विनंती आमदार नितीन पवार यांनी नागरिकांना करु न लॉकडाऊन काळात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.कळवण तालुक्यातील अभोणा, नांदूरी, तिºहळ, देसगाव, वडाळे, दळवट, जिरवाडे, जयदर आदी भागात दौरा करून परिसरातील आरोग्यसेवेची माहिती घेतली. सामाजिक अंतर ठेवून गावोगावी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना घरातच रहा,सुरक्षित रहा, विनाकारण घराच्या बाहेर पडु नका, अत्यावश्यक कामासाठी बाहेर गेलातच तर आपले हात साबणाने स्वच्छ धुवा,मास्क वर सॅनिटायझरचा वापर करा, शेतकऱ्यांनी सुध्दा शेतात काही काम करीत असतांना पूरेसे अंतर ठेऊन कामे करा असे आवाहन केले.तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळते का, नाही? याची माहिती घेऊन ज्याच्यांकडे शिधा पत्रिका आहे परंतु ते दुकानातून धान्य घेत नाही त्यांनी व ज्याच्यांकडे शिधा पत्रिका नाही, अशा गरजूंना धान्य द्यावे असे आवाहन आमदारांनी यावेळी नागरिकाशी बोलतांना केले. गावात कोणी बाहेरची व्यक्ती कोणाकडे आल्यास तात्काळ प्रशासनास कळवून त्यांची आरोग्य तपासणी करून घ्या अशा सुचना दिल्या. लॉकडाऊन काळात कार्यकर्त्यांनी व सामाजिक संस्थांनी सर्वसामान्य, गरजू, शेतमजूरांना आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी ज्ञानदेव पवार, मधुकर जाधव, सोमनाथ सोनवणे, डी. एम गायकवाड, रमेश पवार, राजु पाटील, भिवराज बागुल, सुभाष राऊत, सुधाकर सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kalwan-acकळवणcorona virusकोरोना वायरस बातम्या