शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

येवला महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्र

By admin | Updated: December 21, 2016 23:18 IST

येवला महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्र

येवला : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठीतील प्रवासवर्णने : काल, आज आणि उद्या’ या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झाले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील मराठी विभागाचे प्रमुख व भाषाअभ्यास प्रशाळेचे संचालक डॉ. म. सु. पगारे उपस्थित होते. ख्यातनाम समीक्षक व कवी प्रा. डॉ. एकनाथ पगार यांनी बीजभाषण केले. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यामंदिरचे सहसचिव प्राचार्य व्ही.एस. मोरे होते.  उद्घाटनपर मनोगतात डॉ. म. सु. पगारे यांनी मराठीतील प्रवासवर्णने, वाङ्मयाची परंपरा व वाटचाल याचा आढावा घेतला. मराठी प्रवासवर्णनात धार्मिक स्थळे व त्याची वर्णने मोठ्या प्रमाणात आली असल्याचे सांगून आपल्या धार्मिकतेच्या दृष्टीपलीकडे भाषा, संस्कृती, लोकसाहित्य, परंपरा, निसर्गसौंदर्य यांचा व पर्यटनाचा निखळ आनंद घेता आला पाहिजे. प्रवासवर्णनातून माणूस जोडला जाऊन मानवतावादी जीवनमूल्ये असलेले संस्कार रु जवले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  डॉ. एकनाथ पगार यांनी मराठी प्रवासवर्णनांची सुरुवात महानुभावांच्या स्थलमाहात्म्यपर साहित्यापासून व संत नामदेवांच्या ‘तीर्थावळी’ प्रकरणापासून तपासता येऊ शकते असे सांगून, आधुनिक मराठीतील प्रवासवर्णन वाङ्मयाची सुरुवात गोडसे भटजींच्या ‘माझा प्रवास’ यापासून मानली जाते. चर्चासत्राचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी केले, तर समन्वयक प्रा. धनराज धनगर यांनी चर्चासत्र आयोजनामागील भूमिका मांडली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. लीना पांढरे यांनी केले. या चर्चासत्रासाठी ४३ संशोधक, प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले. (वार्ताहर)