शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकही झळकणार स्टार्टअप नकाशावर

By admin | Updated: July 5, 2017 00:23 IST

नाशिक : भारत सरकारने विविध योजना राबविण्यास सुरूवात केली असून, स्टार्टअप इंडिया व डिजिटल इंडिया असे उपक्रम सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारत सरकारने निती आयोगाच्या माध्यमाने विविध योजना राबविण्यास सुरूवात केली असून, स्टार्टअप इंडिया व डिजिटल इंडिया असे उपक्रम सुरू केले आहे. या धरतीवर गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेश आदी राज्यांनी स्टेट स्टार्टअप अ‍ॅण्ड इनोव्हेशन पॉलिसी अमलात आणले आहेत. आता नाशिकला स्टार्टअप व्हिलेज स्थापित करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय प्रधान सचिवांकडे केली असून, त्यांनी ती मान्य केली आहे. त्यामुळे नाशिकही आता भारताच्या स्टार्टअप नकाशावर झळकणार आहे.निती आयोगाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि महाराष्ट्रातील सर्व भागधारकांचे विचार व मते लक्षात घेता महाराष्ट्र शासन ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन अ‍ॅण्ड स्टार्टअप पॉलिसी २०१७’ तयार करीत आहे. मुंबई आणि पुणे येथे स्टार्टअप इकोेसिस्टीम उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे नागपूर आणि औरंगाबाद येथे अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून स्टार्टअप इकोसिस्टीम तयार करण्यात येत आहे. नाशिक येथे डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर (डिस्क) आणि नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर (एनआईसी) येथे इन्क्युबेशन सेंटर आहेत. तरी नागपूर आणि औरंगाबाद पूर्वी नाशिक येथे अ‍ॅक्स्लेटर स्थापित करणे शक्य असल्याचे खासदार गोडसे यांनी प्रधान सचिव, कौशल्य विकास विभाग यांना सुचविले होते.