शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी सिद्धी तपास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:21 IST

मानवी जीवनात सात वचनांचे पालन केल्यास जीवन सार्थक ठरते व जीवनाचे कल्याण होते. धर्माचे आचरण शरीर व मनावर ठरते. पापाचा विचार मनात अगोदर येतो व नंतर शरीरामार्फत त्याचे पालन होते. सद्विचार विवेकबुद्धीने जीवनातील रहस्य उलगडते. त्यामुळे भगवंताचे नामस्मरण करा, सहज जीवन व्यतीत करा व आपला जन्म सार्थकी लावा, असे प्रतिपादन जैन साध्वी विक्रममाला म.सा. यांनी केले.

मालेगाव कॅम्प : मानवी जीवनात सात वचनांचे पालन केल्यास जीवन सार्थक ठरते व जीवनाचे कल्याण होते. धर्माचे आचरण शरीर व मनावर ठरते. पापाचा विचार मनात अगोदर येतो व नंतर शरीरामार्फत त्याचे पालन होते. सद्विचार विवेकबुद्धीने जीवनातील रहस्य उलगडते. त्यामुळे भगवंताचे नामस्मरण करा, सहज जीवन व्यतीत करा व आपला जन्म सार्थकी लावा, असे प्रतिपादन जैन साध्वी विक्रममाला म.सा. यांनी केले.मानवी जीवनात चोरी, व्यसने, मांसाहार, मदिरा, जुगार यासारख्या गोष्टी आयुष्य उद्ध्वस्त करतात. या व्यसनांपासून सर्वांनी दूरच रहावे. जीवनात पैसा कमावणे पाप आहे; परंतु आयुष्य जगण्यासाठी पैसाच महत्त्वाचा ठरला आहे. या पापाचे प्रायश्चित्त दान करून करावे. सर्व प्रकारच्या दानाला मोठे महत्त्व आहे.सर्व प्रकारचे उपवास व सिद्ध तपासारख्या व्रतांमुळे मानवी जीवनात आत्म्यास सिद्धगती मिळते. त्यामुळे भरपूर उपवास, व्रत, तप, दान, धर्म करा व जीवनाचा खरा अर्थ समजून घ्या, असे साध्वी विक्रममालाजी यांनी सांगितले. हा कार्यक्रम जैन उपाश्रममध्ये सुरू असून, यावेळी जैन समाजाच्या साध्वी यशोवर्म सुरीश्वरजी म.सा., विशिष्ट मालाजी यांच्यासह अनेक साध्वी उपस्थित होत्या. दि. २८ रोजी या सिद्धी तपाची सांगता करण्यात येणार असल्याचे समाजाचे अशोक कोठारी, दिलीप जैन, अमित संघवी यांनी सांगितले.