शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

गोपीकृष्ण जयंती महोत्सवास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:26 IST

घुंगरांचा श्रवणीय पदन्यास, तबल्यातून उमटलेले सूर आणि नृत्याच्या अनोख्या मिलाफाने शुक्रवारी (दि. १८) पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे तीन दिवस चालणाºया या महोत्सवाचे भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

नाशिक : घुंगरांचा श्रवणीय पदन्यास, तबल्यातून उमटलेले सूर आणि नृत्याच्या अनोख्या मिलाफाने शुक्रवारी (दि. १८) पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे तीन दिवस चालणाºया या महोत्सवाचे भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.कीर्ती कलामंदिर यांच्यातर्फे आयोजित २४व्या पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचे यावर्षीचे पहिले पुष्प आदिती नाडगौडा-पानसे यांनी गुंफले. यावेळी ‘रिदमिक पॉइज’ या संकल्पनेवर आधारित कथक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ‘बाजे डमरू हर हर’ या जोगी रागातील शिववंदनेने झाली. संगीत आणि नृत्याचा मिलाफ असलेल्या या कार्यक्रमात यानंतर झपताल पेश करण्यात आला. यामध्ये श्रवणीय पदन्यासासह पेशकार, कायदे, रेले प्रस्तुत करण्यात आले तसेच पेशकार ते द्रुत झपताल अशा अवीट प्रवासाला रसिकांनीदेखील मनमुराद दाद दिली. यानंतर अभिनयातून बंदिशीचे दर्शन घडवत एकाच नायिकेच्या विविध छटा दाखविताना नायिकेचे विराहोत्कांठिता, खंडिता आणि तिच्या प्रियकराच्या स्वप्नात कशी समरस होते याचे दृश्य दाखविण्याचा प्रयत्न कीर्ती कलामंदिरच्या शिष्यांनी केला. आदिती नाडगौडा-पानसे यांच्या संकल्पनेवर तसेच अविराज तायडे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘दि रिदमिक पॉइज’ कार्यक्रमात बल्लाळ, चव्हाण आणि ओमकार अपस्तंभ (तबला), सुभाष दसककर (संवादिनी) यांनी साथसंगत केली, तर आशिष रानडे आणि ज्ञानेश्वर कासार (गायन), तर आदित्य कुलकर्णी आणि केतकी साठ्ये - रानडे यांनी पढंत केली. सूत्रसंचालन वैशाली बालाजीवाले यांनी केले. या महोत्सवाअंतर्गत शनिवारी (दि. १९) नंदिनी सिन्हा (दिल्ली) आणि अशोक कृष्णा (बनारस) यांच्या ‘बैठके ठुमरी’, तर रविवारी (दि. २०) शमा भाटे (पुणे) यांचे कथक सादरीकरण आणि पंडित दीपक मुजूमदार यांचे भरतनाट्यम् नृत्य सादर होणार आहे.