शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

न्देश महोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:27 IST

सिडको : खान्देशी संस्कृतीची ओळख आजच्या पिढीला व्हावी तसेच अहिराणी संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या खान्देश महोत्सवाचे गुरुवारी (दि. २८) ठक्कर डोम येथे मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले.सलग चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात खान्देशी संस्कृतीचे दर्शन होण्याबरोबरच खान्देशी सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन ...

ठळक मुद्देनव्या पिढीला खान्देशी संस्कृतीची ओळख होण्याचा उद्देश ठक्कर डोम येथे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

सिडको : खान्देशी संस्कृतीची ओळख आजच्या पिढीला व्हावी तसेच अहिराणी संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या खान्देश महोत्सवाचे गुरुवारी (दि. २८) ठक्कर डोम येथे मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले.सलग चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात खान्देशी संस्कृतीचे दर्शन होण्याबरोबरच खान्देशी सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. आमदार सीमा हिरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार हिरे यांनी खान्देशी संस्कृती, कला, साहित्य, खाद्यपदार्थ तसेच तेथील सांस्कृतिक महोत्सवास व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली. नोकरी तसेच व्यवसायानिमित्त जळगाव, धुळे, नंदुरबार आदी भागातून नागरिक मोठ्या संख्येने नाशिकमध्ये स्थायिक झाले असून, त्यांच्या भावी पिढीला अहिराणी भाषेचा गोडवा तसेच खान्देशी संस्कृतीची ओळख या महोत्सवानिमित्त होणार असल्याचेही आमदार हिरे यांनी यावेळी सांगितले.यावेळी शोभायात्रेत सहभागी आदिवासी टिपरी नृत्य, वाघ्या मुरळी, संबळ पथक यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी ज्येष्ठ कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यास आणि कानबाई देवीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी महापौर रंजना भानसी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार अनिल कदम, आमदार दीपिका चव्हाण, सुनील बागुल आदींनी आपल्या मनोगतातून खान्देशी बांधवांना शुभेच्छा दिल्या. या महोत्सवास प्रतापदादा सोनवणे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना महाले, दत्ता पाटील, जगन पाटील, संजय न्याहारकर, जिल्हा परिषद आरोग्य सभापती यतिन पगार, बांधकाम सभापती मनीषा पवार, नगरसेवक माधुरी बोलकर, भाग्यश्री ढोमसे, प्रतिभा पवार, कावेरी घुगे, पुष्पा आव्हाड, अलका अहिरे, सुप्रिया खोडे, छाया देवांग, पल्लवी पाटील, दीपाली कुलकर्णी, प्रियंका घाटे, हिमगौरी अहेर, सीमा निगळ, सतिश सोनवणे, भगवान दोंदे, दिलीप दातीर, नीलेश ठाकरे, योगेश हिरे उपस्थित होते.सकाळी जुने सिडको परिसरातील राणाप्रताप चौक येथून भव्य शोभायात्रा काढून या महोत्सवाला औपचारिक सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेत संबळ पथक, लेजीम पथक, आदिवासी नृत्य, टिपरी नृत्य, कानबाई उत्सव देखावा, ढोल पथक आदींचा समावेश होता. राणाप्रताप चौक येथून सुरू झालेली ही शोभायात्रा विजयनगर, तोरणानगर, पवननगर, सावतानगर, त्रिमूर्ती चौक, उंटवाडी या परिसरातून काढण्यात येऊन या शोभायात्रेचा ठक्कर डोम येथे समारोप करण्यात आला.