शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

डोंगऱ्यादेव उत्सवाला प्रारंभ

By admin | Updated: December 19, 2015 23:33 IST

पिळकोस : आदिवासी बांधवांसह ग्रामस्थांचा उत्साह

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथे डोंगऱ्यादेव उत्सवाला प्रारंभ झाला आहे. या उत्सवात आदिवासी बांधवांसह ग्रामस्थांचा उत्साह दिसुन येतो. या उत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे या उत्सवात गावातील आदिवासी कुटुंबातील एक सदस्य पंधरा दिवस या देवाचे कडक व्रत करतो व हा उत्सव ऐन हिवाळ्यात येत असून उत्सव साजरा करण्याची जागा ही पूर्वीपासून कायमची निचित असते. त्या जागेवर चारही बाजूंनी काठ्यांचे कुंपण करून एक द्वार ठेवले जाते. त्या प्रवेश द्वाराला गोमूत्र ठेवले जाते व प्रत्येकाने ते अंगावर शिंपडून खळीत प्रवेश करावयाचा असतो. खळीत मांडव टाकल्यावर मध्यभागी देवदांडा उभा केला जातो, देवदांड्याला झेंडूच्या माळा बांधल्या जातात व सायंकाळी रात्रभर या देवदांड्याभोवती आदिवासी बांधव भाया हे फेर धरून नाचतात. या उत्सवात प्रत्येक सदस्याला माउली म्हटले जाते. उत्सवाच्या सुरुवातीला प्रत्येक कुटुंब आपल्या घरातील सदस्य हा या उत्सवातील मुख्य जोखीमदार भगत याच्या स्वाधीन करतात. उत्सव सुरुवातीपासून ते हा उत्सव सुरळीत पार पडेपर्यंत या सर्व भायांची जबाबदारी भगतावर असते. या उत्सवाचा प्रारंभापासूनचा विधी, पौर्णिमेच्या दिवशी गड घेण्यासाठी गेल्यावर वनदेवता प्रसन्न झाल्यावर डोंगराने दर्शन देण्यासाठी डोंगर जागा देते व तेथून रात्री घरी सुखरूप येईपर्यंत भगत हा सर्वांचा जिवाचा जोखीमदार असतो. या उत्सवात मनोरंजनासाठी पावरी वाद्य वाजवले जाते, तर थाळीवर वनदेवतेच्या कथा सांगण्यात येतात. दररोज दिवसभर माउल्या या शिधा घेण्यासाठी बाहेरगावी जातात व सायंकाळी मुख्य खळीवर मनोरंजन कार्यक्रम केले जातात. पौर्णिमेला शेवटच्या दिवशी डोंगरावर गड घेण्यासाठी गेले असता डोंगरावर दिवे लावले जातात. देवळात कोंबडा सोडला जातो, याबाबत जुने जाणकार वृद्ध जे आजही हयात आहेत ते जुन्या काळी भाया उत्सव साजरा करत तेव्हाची अशी आख्यायिका आहे की पूर्वी भगत व भाया यांची एवढी कडक उपासना होती की गड घेण्यासाठी डोंगरावर गेले असता पौर्णिमेच्या रात्री या सर्व माउल्या डोंगरात उंच काठीसमवेत प्रवेश समाविष्ट करत, त्यावेळेस डोंगरातील देवतेच्या ठिकाणाची पूजा, दर्शन घेऊन भाया परत येत. उत्सव साजरा करणाऱ्या माउल्या हा विधी चुकल्यामुळे सर्व माउल्या वनदेवतेने डोंगर उघडल्यावर मध्ये गेल्यावर अजूनही आल्या नसून यामुळे या उत्सवात भगत हा माउल्यांसाठी महत्त्वाचा असतो, यामुळेच या उत्सवकाळात आदिवासी महिला या कुंकू लावत नाहीत, जेवणात तेलाचा वापर करत नाही, पाट्यावर मसाला वाटत नाहीत, दूध, भाजीत मीठ खात नाहीत, भाजीपाला खात नाही, आहारात फक्त डाळी खातात. अशा या ग्रामीण भागाचे आराध्य व श्रद्धेच्या देवात डोंगऱ्यादेव उत्सवाला प्रारंभ झाला आहे.