शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीच्या ठरावाला ‘किंमत’ उरणार?

By admin | Updated: October 9, 2015 00:18 IST

तीन कोटींचा केला ठेका रद्द

नाशिक : नुकत्याच झालेल्या सिंहस्थ कुंभमेळादरम्यान साधुग्राममधील महापालिकेच्या ठेक्याबाबत ई-निविदा पद्धतीबाबत मोहोळ उठल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता जिल्हा परिषदेच्या तीन कोटी रुपयांच्या सौर पथदीप खरेदीचा ठेकाही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ग्रामीण भागातील जवळपास ३०० ग्रामपंचायतींमध्ये सौर पथदीप पुरवठा करण्याची योजना असून, त्यासाठी पाच महिन्यांपूर्वीच दरकरार पद्धतीने राजस्थानच्या एका कंपनीला ठेका देण्यात आला होता. प्रत्यक्षात राजस्थानच्या जयपूरस्थित संबंधित कंपनीने वेळेत सौर पथदीपांचा पुरवठा न केल्याने पाच महिन्यांनंतर या कंपनीचा दरकरार संपुष्टात आणून नव्याने ई-निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात येऊन तीन कोटींच्या सौर पथदीप खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात राजस्थान, गुजरातसह अन्य राज्यांतील व महाराष्ट्रातील पाच बड्या कंपन्यांनी यासाठी स्पर्धा केली. त्यात गुजरात स्थित एका कंपनीने चक्क अंदाजपत्रकीय रक्कमेच्या २८ टक्केन्यूनतम दराने निविदा भरल्याने याच कंपनीला सौर पथदीप पुरविण्याचा ठेका मिळणार हे जवळपास नक्की झाले. त्यामुळेच इतक्या कमी दराने कसा ठेका परवडणार, त्याला गुणवत्ता राहणार काय? असे प्रश्न उपस्थित करून नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा ठेका पुन्हा रद्द करण्याचा ठराव झाला. मुळात स्थायी समितीला ५० लाखांपर्यंत कामे मंजूर करण्याचा अधिकार असताना चक्क तीन कोटींचा ठेका कसा रद्द होऊ शकतो? शिवाय कंपनीने २८ टक्केन्यूनतम दराने ठेका भरल्याने जिल्हा परिषदेला २२,४७५ ऐवजी २७७५ असे किमान ३०० जादाचे पथदीप ग्रामीण भागात बसविण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच एका सौर पथदीप खरेदीमागे जवळपास एक हजार रुपये बचत होणार असल्याने चक्क दोन लाख ८० हजारांची जिल्हा परिषदेची बचतही होणार असल्याचे समजते. दुसरीकडे नियमानुसार हा ठेका न्यूनतम दर आलेल्या कंपनीस न दिल्यास संबंधित कंपनी न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहेत. (प्रतिनिधी)