शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ंफ्लॅटधारकांना दहा लाखांना गंडा

By admin | Updated: July 3, 2017 00:50 IST

फसवणूक करणाऱ्या जागेचे मूळ मालक तसेच बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी: धुळे जिल्ह्यातील श्री समर्थ पतसंस्थेचे कर्ज घेऊन जागा, फ्लॅट विक्री करताना सदनिकेच्या सभासदांना जमिनीवरील बोजा न दाखवता कोरा सातबारा देऊन तब्बल बारा सभासदांची फसवणूक करणाऱ्या महात्मानगर येथील जागेचे मूळ मालक तसेच दिंडोरी रोडवरील कलानगर येथे राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतधाम येथील अमोल रमेशसिंह परदेशी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. परदेशी व त्यांच्यासह एकूण बारा सदस्यांनी अमृतधाम येथील सर्व्हे क्रमांक २६१/३ अ व २६१/३ ब येथे बांधकाम केलेल्या सदनिकेत फ्लॅट विकत घेतले होते. धुळे येथील श्री समर्थ पतसंस्थेने या इमारतीतील सदस्यांना जप्तीची नोटीस पाठविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ महात्मानगर मॉर्निंग ग्लोरी अपार्टमेंट येथील जागा मालक नरेंद्र पोपट पगार यांनी काही वर्षांपूर्वी धुळे येथील श्री समर्थ पतसंस्थेकडून दहा लाख रु पये कर्ज घेतले होते. त्यानंतर २००३ ते २०१३ या कालावधीत त्यांनी दिंडोरी रोडवरील कलानगर येथे राहणाऱ्या दिनेशभाई अर्जुनभाई पटेल यांना ही जागा विकासासाठी दिली. या जागेवर सदनिका उभारल्यानंतर तक्र ारदार परदेशी यांनी व अन्य नागरिकांना फ्लॅट विक्र ी केली व फ्लॅट विक्री करताना जमिनीवरचा बोजा न दाखवता कोरा सातबारा दिला. सदनिकेत सभासद राहायला गेल्यानंतर पतसंस्थेने सभासदांना जप्तीची नोटीस बजावली असता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच परदेशी यांच्यासह सभासदांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर आडगाव पोलिसांत जागेचा मूळ मालक पगार व बिल्डर पटेल या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रॉपर्टीधारकांना बनावट दस्ताऐवज करून लुटण्याचे अनेक प्रकार शहरात घडले असून, यात अनेक शासकीय यंत्रणाही गुंतल्याचे बोलले जात आहे.