शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्राममध्ये साचले कचऱ्याचे ढीग

By admin | Updated: September 16, 2015 23:38 IST

सर्वत्र पसरली दुर्गंधी; आजार पसरण्याची भीती

पंचवटी : तपोवन साधुग्राम परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दुर्गंधीचे वातावरण पसरल्याने साधू-महंतांना, तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या भाविकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. साधुग्राम परिसरात कायम स्वच्छता राहावी, यासाठी दैनंदिन घंटागाड्या कचरा जमा करण्याचे काम करतात. याशिवाय सफाई कर्मचारी रस्ते सफाईचे काम करत असले तरी तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे काही भागात पाणी साचून आहे. याशिवाय या साचलेल्या पाण्याच्या जवळच मोठ्या प्रमाणात जेवणाच्या पत्रावळी, तसेच उरलेले खरकटे अन्न जमा होत असल्याने ही दुर्गंधी सुटली असल्याचे बोलले जात आहे. साधुग्राममध्ये प्रवेश केल्यानंतर साधारणपणे दोनशे फूट अंतर पार केल्यानंतर नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने तपोवन साधुग्राम बघण्यासाठी आलेल्या भाविकांना नाकातोंडावर रुमाल ठेवूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दुर्गंधी सुटली असल्याने प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन औषध फवारणी करणे गरजेचे आहे. येथील काही साधू-महंत तसेच साधुग्राममध्ये येणारे भाविक हे उघड्यावरच लघुशंका करत असल्याने त्यातच दैनंदिन जमा होणारा केरकचरा यामुळेच दुर्गंधी सुटली आहे. (वार्ताहर)