शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसच्या सुट्या भागांची खरेदी रखडली

By admin | Updated: November 2, 2014 23:39 IST

साहित्याची प्रतीक्षा : सहा महिन्यांपासून होतेय मागणी; चालक-वाहकांकडून नाराजी व्यक्त

नाशिक : दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसेसची सुट्या भागांविना गैरसोय होत असून, अनेक महिन्यांपासून मागणी करूनही साहित्य उपलब्ध होत नसल्याने चालक- वाहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महामंडळाच्या बसेस रस्त्यातच बंद पडणे, पंक्चर होणे, ब्रेक फेल होणे यांसारख्या घटना घडल्या असून, रस्त्यावरच बस बंद पडून प्रवाशांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची वेळही बसचालकांवर आली आहे. त्यामुळे जुन्या झालेल्या बसेसला विविध सुट्या भागांचा पुरवठा करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होते आहे; परंतु मध्यवर्ती कार्यालय आणि विभागीय कार्यालयाकडून त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असून, सुट्या भागांअभावी एखादी दुर्घटना झाल्यानंतर महामंडळ सुधारणार का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी केला आहे. मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने राज्यातील सर्व आगारांना सुटे भाग पुरवले जातात. त्याप्रमाणेच विभागीय पातळीवर स्थानिक अधिकाऱ्यांनाही काही प्रमाणात त्याची खरेदी करायचे अधिकार असतात; परंतु असे असतानाही गेल्या सहा महिन्यांपासून ही खरेदीच रखडली असून, चालक आणि वाहक त्यामुळे बेजार झाले आहेत. अनेक बसेसला तर प्रक्रिया केलेले टायर आणि ट्यूब बसविण्यात आले आहेत. त्यामुळे बस व्यवस्थित प्रवास करेल याची कोणतीही खात्री चालकांना देता येत नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जात असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. प्रवासी जमा करण्यासाठी महामंडळाच्या वतीने विविध चांगल्या योजना राबविल्या जातात. सुरक्षित वाहतूक म्हणूक प्रवाशीही महामंडळालाच प्राधान्य देतात. असे असताना लाखो रुपयांचा नफा कमवणाऱ्या महामंडळाने किमान सुट्या भागांच्या खरेदीसाठी तरी टाळाटाळ करू नये, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)