शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

वळवाच्या पावसाचा शहरात शिडकावा

By admin | Updated: May 14, 2017 01:30 IST

नाशिक : हैराण झालेल्या नाशिककरांना (दि.१३) वळवाच्या पावसाचा शिडकावा झाल्याने दिलासा मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : उन्हाच्या काहिलीने गेल्या दोन महिन्यांपासून हैराण झालेल्या नाशिककरांना शनिवारी (दि.१३) वळवाच्या पावसाचा शिडकावा झाल्याने दिलासा मिळाला. संध्याकाळच्या सुमारास शहरातील विविध भागात आकाशात ढग दाटून आले आणि पावसाच्या सरी कोसळल्या. शहरात पहिल्या पावसामुळे मातीचा सुगंध दरवळला. अनेकांनी घराबाहेर पडून पावसाचा आनंद घेतला. मात्र पावसामुळे शहरासह उपनगरांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. शहरातील वातावरणात दोन दिवसांपासून प्रचंड उष्मा वाढला होता. आर्द्रता वाढल्याने नाशिककर घामाघूम झाले होते. उकाडा प्रचंड असह्य होत असल्याने रात्रीच्या वेळीदेखील नागरिकांना घरात बसणे कठीण झाले होते. अखेर आज दुपारनंतर वळवाच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला; मात्र तपमानात खूप काही घट झाली नाही. शनिवारी (दि.१३) शहराचे कमाल तपमान ४० अंश इतके नोंदविले गेले तर किमान तपमान २५ अंशांवर होते. एकूणच पावसाचा शिडकावा झाला असला तरी किमान तपमानात घट होण्यास मदत होणार आहे; मात्र कमाल तपमान कमी होण्यास कितपत मदत होईल आणि लहरी निसर्ग नाशिककरांवर कशी कृपा करेल, हे सांगता येत नाही. ढगांचा गडगडाट अन् विजांचा कडकडाट सुरू होताच महावितरणने वीजपुरवठा खंडित केला.