शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विभाजनाची टांगती तलवार

By admin | Updated: February 10, 2016 23:39 IST

राज्य सरकार आणखी एक पाऊल पुढे : समिती गठीत; नाशिककरांचा विरोध निष्प्रभ

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करून नागपूरला स्वतंत्र आयुष विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. नियोजित विद्यापीठाच्या पुढच्या कार्यवाहीसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तांत्रिक समिती गठित केली असून, या बैठकीत आयुर्वेदाच्या अनेक शाखांची स्वतंत्र विद्यापीठासाठी अनुकूलता दर्शविल्याचे समजते. या निर्णयामुळे मंत्रिमहोदयांनी नाशिककरांचा विरोध दुर्लक्षित केल्याचेच दिसून येते. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करण्यासाठी आयुष विभागाने स्थापन केलेल्या समितीने ७० एकर जागेची उपलब्धता करून दिल्यानंतर आता विद्यापीठ आकारास येण्यासाठी कोणत्या तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागेल यासाठीची दुसरी समिती तावडे यांनी नियुक्त केली आहे. वास्तविक नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाचे विभाजन करून आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानीचे स्वतंत्र विद्यापीठ केल्यास नाशिककर रस्त्यावर उतरतील अशी भूमिका नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी घेतली होती. अनेक राजकीय नेत्यांनी तर यासाठी प्रसंगी आंदोलनाचीदेखील तयारी बोलून दाखविली होती. विशेष म्हणजे होमिओपॅथी आणि युनानी महाविद्यालयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आरोग्य विद्यापीठाचे विभाजन करू नये अशी विनंती करीत आरोग्य विद्यापीठासोबतच संलग्न ठेवण्यात यावे असे म्हटले होते. त्यामुळे आरोग्य विद्यापीठाला मोठा दिलासा मिळाला होता. लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांनीदेखील समर्थनाचे पत्र दिल्याने शासन नाशिकरांच्या भावनांचा आदर करून फेरविचार करेले असे वाटत असताना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करीत आयुष विद्यापीठ स्थापनेबाबतचे एक पाऊल पुढे टाकले आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर तर मुख्यमंत्र्यांनी आपणाला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगून स्वतंत्र आयुष विद्यापीठ किंवा आरोग्य विद्यापीठाचे विभाजन करण्याचे विचाराधीन नसल्याचे फरांदे यांना सांगितले होते. असे असतानाही तावडे यांनी आयुर्वेदाच्या विविध संस्था आणि संघटनांशी चर्चा करून विभाजन होणार असल्याचेच संकेत दिले आहेत. (प्रतिनिधी)