येवला : नगरसुल येथील कोविड सेंटरला पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी अचानक भेट देवून पाहणी केली.गुरुवारी ( दि.३) सकाळी सहा वाजता सभापती गायकवाड यांनी नगरसुल येथील कोविड सेंटर गाठले व तेथील बाधित रुग्णांची विचारपूस केली. डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी चांगल्या पद्धतीने काळजी घेत असल्याचे यावेळी रुग्णांनी सांगितले. तर उपस्थित डॉक्टर व इतर कर्मचारी वर्गाशीही त्यांनी चर्चा केली. कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.येवला तालुक्याचा पॉझीटीव्हीटी रेट कमी होत आहे. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात संसर्ग अधिक राहिला आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच शासन, प्रशासन, आरोग्य विभागाच्या सूचना, नियम देखील पाळावे, तरच तालुका कोरोना मुक्त होईल असेही गायकवाड यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी डॉ. वसंत जाधव, डॉ. पारस पटणी, डॉ. सीमा सोनवणे आदी उपस्थित होते.
नगरसुलच्या कोविड सेंटरला सभापतींची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 01:11 IST
येवला : नगरसुल येथील कोविड सेंटरला पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी अचानक भेट देवून पाहणी केली.
नगरसुलच्या कोविड सेंटरला सभापतींची भेट
ठळक मुद्देकामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.