शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

पेरणी की लावणी यावरून शेतकरी व बॅँकेत जुंपली

By admin | Updated: August 13, 2014 00:40 IST

पीकविमा योजनेच्या वाढीव मुदतीवरच प्रश्नचिन्ह

पेठ : शासनाने जाहीर केलेल्या खरीप हंगामासाठी राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेची मुदत वाढवली असली तरीही पेठ तालुक्यात मात्र पीकविमा योजनेसाठी पेरणी की लावणी यावरून शेतकरी व जिल्हा बँक प्रशासनात चांगलीच जुंपली आहे. एकीकडे बँक प्रशासन विम्याची रक्कम भरून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात असताना बँक प्रशासन मात्र शासनाच्या अध्यादेशाचा आधार घेत विमा पेरणीसाठी दिला जात असून, भात व नागलीच्या लावणीचा विमा घेतला जात नसल्यावर ठाम आहे़आदिवासी भागात साधारण मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भात व नागलीच्या बियाणाची पेरणी केली जाते़ पेरणी केलेल्या क्षेत्राचा दरवर्षी ३१ जुलैअखेर शेतकऱ्यांनी कोणत्याही सहकारी अथवा राष्ट्रीयकृत बँकेत विमा उतरवणे आवश्यक असते़ त्याप्रमाणे पेठ तालुक्यातील जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी ८ लक्ष ४८ हजार २१४ रुपये विम्याचा हप्ता नाशिक जिल्हा बँकेत भरणा केला़ त्यानंतर शासनाने याची मुदत १६ आॅगस्टपर्यंत वाढवली़ मात्र आदेशात वाढीव मुदतीचा लाभ केवळ १ ते १६ आॅगस्टदरम्यान पेरणी केलेल्या पिकांवरच लागू असल्याने बँक प्रशासनाने आॅगस्ट महिन्यात लावणी केलेल्या पिकांवरील विमा रक्कम स्वीकारण्यास नकार दिला़ तर शेतकऱ्यांनी मात्र उशिराने पेरणी झाल्याने आॅगस्ट महिन्यात लावणी केलेल्या पिकांनाही विमा संरक्षण द्यावे अशी मागणी केली़ यामुळे पीकविमा योजना ही पेरणी की लावणी यावर तालुक्यात चांगलाच खल सुरू आहे. यामुळे सामान्य शेतकरी मात्र चांगलाच बुचकळ्यात सापडला आहे़